इंदूरच्या ताईंनी काँग्रेसला काय दिलं आव्हान ?

इंदूरच्या ताईंनी काँग्रेसला काय दिलं आव्हान ?

  • Share this:

इंदूर, 18 मार्च : लोकसभेच्या मावळत्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसला खडं आव्हान दिलं आहे. आपल्याविरोधात कितीही ताकदीचा उमेदवार उभा केला तरी माझी त्यासाठी तयारी आहे, असं त्या म्हणाल्या.

सुमित्रा महाजन या मध्य प्रदेशमधल्या बहुचर्चित इंदूर लोकसभा मतदारसंघातून 8 वेळा निवडून आल्या आहेत. काँग्रेसने आपल्याविरोधात तुल्यबळ उमेदवार दिला तर लढण्यात आनंद वाटेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

इंदूरमध्ये सुमित्रा महाजन यांना शह देण्यासाठी काँग्रेस कुणीतरी बडा नेता रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. पण आपल्याकडून निवडणुकीची जय्यत तयारी झाल्याचा दावा सुमित्रा महाजन यांनी केलाय.वातावरण आपल्यालाच अनुकूल आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षमपणे ही निवडणूक लढवणार आहोत. मोदींनी परदेशातही भारताचं नाव मोठं केलं आहे, असं त्या म्हणाल्या.

इंदूरच्या 'ताई'

सुमित्रा महाजन या लोकसभेच्या मावळत्या अध्यक्ष आहेत. पण त्याचबरोबर सर्वात जास्त काळ लोकसभेच्या सदस्य असणाऱ्या महिला खासदार अशीही त्यांची ओळख आहे.

1989 मध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रकाशचंद्र सेठी यांचा पराभव केला होता. रेल्वे, नागरी उड्डाण, नगरविकास या क्षेत्रात त्यांनी इंदूरसाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे.

6 जून 2014 ला सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. लोकसभेच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी प्रभावीपणे काम पाहिलं. 2015 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 25 खासदारांवर निलंबनाची कठोर कारवाई केली होती. शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे त्यांनी लोकसभाध्यक्षपदाच्या कारकिर्दीवर आपला ठसा उमटवला.

============================================================================================================================================================================================

First published: March 18, 2019, 6:43 PM IST

ताज्या बातम्या