सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 3 जवान शहीद तर 13 जण बेपत्ता

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 3 जवान शहीद तर 13 जण बेपत्ता

या चकमकीत तीन सैनिक ठार झाले असून 14 सैनिक जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच वेळी, 13 सैनिक अद्याप बेपत्ता आहेत. जखमी सैनिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

सुकमा / जगदलपूर, 22 मार्च : छत्तीसगडच्या सुकमा इथे शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन सैनिक ठार झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. तर 14 जवान जखमी आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचवेळी चकमकीत पाच ते सहा नक्षलवादीही मारले गेले आहेत. या चकमकीमध्ये बरेच नक्षलवादी जखमी झाल्याची माहितीही देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सैनिकांनी मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जखमी सैनिकांना रायपूर इथल्या रामकृष्ण रुग्णालयात दाखल केलं आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी सैनिकांच्या शहीद झाल्याची पुष्टी केली आहे. रात्री त्यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही याबाबत माहिती दिली आहे. डीजीपी अवस्थी म्हणाले की चकमकीत पाच ते सहा नक्षलवादी ठार झाले. अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज आहे. या चकमकीत तीन सैनिक ठार झाले असून 14 सैनिक जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच वेळी, 13 सैनिक अद्याप बेपत्ता आहेत. जखमी सैनिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नक्षलवाद्यांनी हल्ल्यात सैनिकांना अडकवले

कासलपाड परिसरात मोठ्या संख्येनं नक्षलवादी जमल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. यानंतर डीआरजी आणि एसटीएफची टीम शुक्रवारी दोरनापाल इथून रवाना झाली. ही टीम बुर्कापाळ इथे पोहोचली आणि कोब्रा जवानांच्या सैन्यानं त्यांच्याबरोबर नक्षलवादी चकमकीसाठी सहकार्य केलं. जवान अचानक नक्षलवाद्यांना चकमकीत अडकवण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु सैनिक जंगलात घुसल्याची बातमी आधीच नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचली होती.

...आणि म्हणून सैनिकांना जंगलात प्रवेश मिळू शकला

प्लानचा एक भाग म्हणून नक्षलवाद्यांनी जवानांना जंगलात प्रवेश करण्याची मुभा दिली होती. सैनिक कासलपाडच्या पुढे गेले आणि जेव्हा नक्षलवाद्यांना कोणतीही हालचाल दिसली नाही तेव्हा ते परत येऊ लागले. कासलपाडमधून सुरक्षा दलाच्या बाहेर येताच नक्षलवादी हल्ल्यात अडकले. नक्षलवाद्यांनी कासलपाडच्या काही अंतरावर कोराज डोंगरीजवळ डोंगराच्या शिखरावरुन सैनिकांवर हल्ला केला. अचानक झालेल्या गोळीबारात काही सैनिक जखमी झाले. यानंतर दोघांकडून मधूनमधून गोळीबार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2020 08:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading