विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, प्रेमप्रकरणातून आयुष्य संपवल्याचा संशय

विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, प्रेमप्रकरणातून आयुष्य संपवल्याचा संशय

एका विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

रायपूर, 31 मार्च :  एका विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हादरवणारी ही घटना छत्तीसगडमधील सुकमा येथील गांधी नगर परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून विद्यार्थिनीनं स्वतःचं आयुष्य संपवल्याचे म्हटलं जात आहे. विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

सूरजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 20 वर्षांच्या विद्यार्थिनीनं आपलं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान मुलीनं हातावरच सुसाईड नोट लिहिल्याचं पोलिसांना आढळलं. भाऊ आणि बहिणीनं खूश राहावं, असं तिनं हातावर लिहिलं होतं.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वाचा अन्य बातम्या

राहत्या घरात आढळले 2 मृतदेह, 'या' गोष्टीमुळे वाढलं रहस्य

बॅनरवर आदित्य ठाकरेंचा फोटो नसल्यामुळे युवासैनिक नाराज, पूनम महाजन मातोश्रीवर?

'शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत', आव्हाडांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

 VIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 04:13 PM IST

ताज्या बातम्या