सुखोई विमानातून अशी केली बॉम्बहल्ल्यांची चाचणी, डीआरडीओचं यश

सुखोई विमानातून अशी केली बॉम्बहल्ल्यांची चाचणी, डीआरडीओचं यश

भारताने पाकिस्तानवर यशस्वी एअर स्ट्राइक केला. त्यानंतर आता डीआरडीओ ने सुखोई विमानातून बॉम्बहल्ले करण्याची चाचणी केली आहे. संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वाची आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मे : मोदी सरकार आल्यानंतर संरक्षण क्षेत्रातूनही एक खुशखबर आली आहे. डीआरडीओ ने एक चाचणी यशस्वी केली. सुखोई 30 MKI या विमानातून 500 किलो वजनाचे बॉम्बहल्ले करण्याची ही चाचणी होती.


ठराविक लक्ष्य गाठण्याची क्षमता

या विमानातून डागण्यात आलेले हे बॉम्ब ठराविक लक्ष्य गाठू शकतात आणि त्याच ठिकाणी त्यांचा स्फोट होतो. डीआरडीओ ने ही चाचणी राजस्थानमधल्या पोखरणमध्ये केली.

पुलावामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला. अशा पद्धतीचे लांब पल्ल्याचे हल्ले करायचे झाले तर ही शस्त्रसामग्री उपयोगी पडणार आहे.


पोखरण भागात चाचणी

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डीआरडीओ संरक्षण विषयक तंत्रज्ञान विकसित करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. त्याचाच एक भाग म्हणून पोखरण भागात ही चाचणी करण्यात आली.भारताने एअर स्ट्राइकमध्ये मिराज विमानांनी पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात बालाकोटमधल्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं.या विमानांतून डागलेल्या क्षेपणास्त्रांनी बालाकोटमधल्या दहशतवादी तळांचा अचूक वेध घेतला. त्यामुळेच एअर स्ट्राइक यशस्वी झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 07:52 PM IST

ताज्या बातम्या