भारतीय हवाई दलाचं 'सुखोई-30' लढाऊ विमान बेपत्ता

भारतीय हवाई दलाचं 'सुखोई-30' लढाऊ विमान बेपत्ता

अरूणाचप्रदेशातल्या तेजपूरच्या तळावरून सरावासाठी सुखोई निघालं होतं. हे विमान चीनच्या सीमेजवळ असताना बेपत्ता झाल्याचं कळतंय.

  • Share this:

23 मे : भारतीय हवाईदलाचं सुखोई 30 हे लढाऊ विमान बेपत्ता झालंय. आसामजवळ असलेल्या तेजपूर भागातून हे विमान बेपत्ता झालंय. या विमानात 2 पायलट आहे.

अरूणाचप्रदेशातल्या तेजपूरच्या तळावरून सरावासाठी सुखोई निघालं होतं. विमान चीनच्या सीमेजवळ असताना बेपत्ता झाल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान जुनं झालं होतं. त्याबद्दल कारवाई सुद्धा सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वीच हवाई दलाचं सुखोई-30 राजस्थानच्या बाडमेर इथं क्रॅश झालं होतं. या घटनेत 3 जण जखमी झाले होते. विशेष म्हणजे या दुर्घटनेत दोन्ही पायलट सुखरूप बचावले होते.

याच महिन्यात केंद्र सरकारने 2013-14 पासून ते आतापर्यंत 22 विमान क्रॅश झाले अशी माहिती राज्यसभेत दिली. मानवी चूक आणि तांत्रिक बिघाडामुळे हे अपघात झाले असंही सांगण्यात आलं.

आता पुन्हा एकदा सुखोई-30 च्या बेपत्ता झाल्याची घटना घडलीये. या विमानाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2017 05:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading