S M L

सुंजवातली चकमक संपली; 4 दहशतवादी ठार तर 5 जवान शहीद

चकमक 30 तासांनंतर संपली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Feb 11, 2018 04:38 PM IST

सुंजवातली चकमक संपली; 4 दहशतवादी ठार तर 5 जवान शहीद

11 फेब्रुवारी : जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवा इथे दहशतवादी आणि लष्कर यांच्यातली चकमक  30 तासांनंतर संपली आहे. लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यात सैन्याला यश आले आहे. या हल्ल्यात 5 जवान शहीद  तर, भारतीय जवानांना 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवले आहे. या दहशतवाद्यांना शाळेवर हल्ला करायचा होता. दुसरा शनिवार होता म्हणून शाळा बंद होती. यामुळे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला केला.

शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला केला. पहाटे पावणे पाचच्या सुमारास सुंजवा लष्करी कॅम्पवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. तसंच, ग्रेनेड ब्लास्टचा आवाज झाल्याची 00देखील माहिती आहे. हल्लेखोर अतिरेकी जैश ए मोहम्मदचे असून त्यांनी पंजाब सीमेवरून जम्मूत प्रवेश केला. स्थानिक दोन काश्मिरी नागरिकांनी त्यांना जम्मूपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2018 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close