एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने दोन सख्ख्या भावांची आत्महत्या; जन्मपत्रिकेतून रहस्य उलगडल

एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने दोन सख्ख्या भावांची आत्महत्या; जन्मपत्रिकेतून रहस्य उलगडल

'कितीही प्रयत्न केला तरी ग्रहांच्या दशेनुसार आत्महत्येचा योग निश्चित आहे. आता काय राहिलंय..काहीच नाही..अध्याय समाप्त...!'

  • Share this:

भोपाळ, 13 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये तीन दिवसात 2 भावांनी एकाच जागी एकाच प्रकारे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठा भाऊ प्रवीण चौहान याने शिप्रा येथील पुलावरुन नदीत उडी मारली व यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी छोटा भाऊ पीयूष चौहान याने त्याच जागेवरुन नदीत उडी मारुन आत्महत्या केली.

दोघांनी एकाच ठिकाणीहून सारख्याच प्रकारे आत्महत्या केली आहे. तपासानंतर या दोघांच्या मृत्यूमागे पत्रिकेचं कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. मोठा भाऊ प्रवीण चौहान याने मरण्यापूर्वी आपली पत्रिका तयार केली होती. यामध्ये त्याचा आत्महत्येचा योग होता. प्रवीणने पत्रिकेत लिहिलं होतं की, कितीही प्रयत्न केला तरी ग्रहांच्या दशेनुसार आत्महत्येचा योग निश्चित आहे. आता काय राहिलंय..काहीच नाही..अध्याय समाप्त...!

हे ही वाचा-मंदिरात केला लग्नसोहळा; तब्बल 500 भटक्या कुत्र्यांसह नवदाम्पत्याच प्रीतीभोजन

पत्रिका तयार केल्यानंतर प्रवीणने शिप्रा पुलावरुन उडी मारली होती. प्रवीणने मरण्यापूर्वी एका सुसाइड नोटही लिहिली होती, ज्यामध्ये कर्ज, आजारपणामुळे त्रस्त असल्याचे नमूद केले होते. नोटमध्ये त्याने कुटुंबाला श्राद्ध न घालण्याची विनंती केली होती. प्रवीणच्या मृत्यूनंतर 3 दिवसांनी त्याचा छोटा भाऊ पीयूषने देखील शिप्राच्या पुलावरुन उडी मारली. पीयूषने नृसिंह घाटावरील पुलावरुन उडी मारली. येथूनच त्याच्या मोठ्या भावाने उडी मारली होती. पीयूष आपल्या भावाच्या फोटोवर हार चढविण्यासाठी फुल आणायता जातो, असं सांगून घराबाहेर पडला. दोन्ही भावांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणात आत्महत्येशिवाय कर्ज व इतर मुद्द्यांचाही तपास करीत आहे. प्रवीणने आपल्या सुसाइड नोटमध्ये कर्ज फेडल्यानंतरही मोठ्या संख्येने व्याज द्यावं लागत असल्याचा उल्लेख केला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 13, 2020, 6:15 PM IST
Tags: sucide

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading