आत्महत्येच्या घटनांनी वाढते माध्यमांची जबाबदारी! या गोष्टींबाबत जागरुकता बाळगणं गरजेचं

आत्महत्येच्या घटनांनी वाढते माध्यमांची जबाबदारी! या गोष्टींबाबत  जागरुकता बाळगणं गरजेचं

आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना हेल्पलाईन नंबरची गरज असल्यास या नंबरवर संपर्क साधावा.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून : देशात आत्महत्येचं प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशातच नाही तर जगभरात प्रत्येक वर्षाला जवळपास 8, 50,000 लोकांचा आत्महत्येमध्ये मृत्यू होतो तर 15 मिलियन लोक आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतात. या आत्महत्येच्या घटनेनंतर सर्वात महत्वाची जबाबदारी आणि रोल माध्यमांचा असतो असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. अनेकदा आत्महत्येच्या बातम्या हेडलाईन, वेगवेगळ्या बाजूनं रंगवून सांगितल्या जातात. यासोबतच सातत्यानं त्या बातम्या दाखवल्यानं कुटुंबीय आणि आत्महत्या करणाऱ्याच्या कुटुंबीयांमध्ये त्याचा परिणाम होत असतो.

आत्महत्या हा मानसिक आजार आहे. दैनंदिन जीवनात आत्महत्या ही एक गंभीर समस्या आहे. एका रिसर्चमध्ये केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 15 ते 35 वर्षे वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया जास्त आत्महत्या करतात. समाजशास्त्रज्ञ असे म्हणतात की बर्‍याच वेळा ही आत्महत्या अजिबात समजत नाहीत. हे आत्महत्या अनेकदा एखाद्या संसर्गजन्य रोगासारखे काम करते. तज्ज्ञांच्या मते आत्महत्या करण्याची मानसिकता एखाद्या संसर्गासारखी पसरत जाते आणि ती हानिकारक आहे. अशावेळी माध्यमांची भूमिका आणि जबाबदारी फार महत्त्वाची असते.

बहुतेक परदेशी विद्यापीठांमध्ये जेव्हा माध्यमांविषयी शिकवण्याची वेळ येते तेव्हा 'आत्महत्ये' च्या बातम्या कशा प्रकाशित करायच्या याबद्दल सांगितलं जातं. एखाद्या विशिष्ट आत्महत्येच्या घटना समान वयोगटातील किंवा वर्गाच्या लोकांच्या वागणुकीच्या बाबतीत एकसारख्या नसाव्यात अशी बातमी प्रकाशित करताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

माध्यमांनी बातम्या दाखवताना काही गोष्टींबाबत जागरुकता बाळगणं आवश्यक आहे.

1- आत्महत्येच्या घटनेत कुठेही अतिशयोक्ती नसावी ती केवळ एक बातमी म्हणून त्यातील सत्य सर्वांसमोर आणायला हवं.

2-आत्महत्येची बातमी लिहिताना आपल्याकडे काही मानसिक आजार किंवा नैराश्याचा मुद्दा समोर आणला पाहिजे, हा या आजारावर उपाय आहे. आत्महत्या हा उपाय नाही.

3-बातमी प्रकाशित करताना हेल्पलाईन नमूद करावी.

4- आत्महत्या करून नये यासाठी जनजागृती करायला हवी.

5- आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या शरीराचे फोटो आणि सुसाईड नोट प्रकाशित केले जाऊ शकत नाही.

6-आत्महत्येच्या बातम्यांमध्ये अतिशयोक्ती केलं जाऊ शकत नाही.

7- आत्महत्येच्या बातम्यांमध्ये घटनेचे गूढ रुपांतर करणे अयोग्य आहे.

आत्मघाती व्यवहार-

'Suicidal Behaviour – Assessment of People at Risk' आत्महत्या आणि मानसिकतेचा अभ्यास करणारं पुस्कर डॉ. फराह किदवई यांनी लिहिलं आहे. यामध्ये माध्यमांनी आत्महत्येची बातमी कशी द्यावी याबाबत माहिती दिली आहे.

नोट: आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना हेल्पलाईन नंबरची गरज असल्यास या नंबरवर संपर्क साधावा.

आसरा (मुंबई) 022-27546669

स्नेहा (चेन्नई) 044-24640050

सुमित्री (दिल्ली) 011-23389090

कूज (गोवा) 0832- 2252525

जीवन (जमशेदपूर)) 065-76453841

प्रत्युषा (कोची) 048-42448830

मैत्री (कोची) 0484-2540530

रोशनी (हैदराबाद) 040-66202000

लाईफलाईन 033-64643267 (कोलकाता)

First published: June 18, 2020, 1:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या