डाबर, पतंजली, झंडुसह अनेक ब्रँडच्या मधात मोठी भेसळ; चीनचा मोठा हात, CSE चा खुलासा

डाबर, पतंजली, झंडुसह अनेक ब्रँडच्या मधात मोठी भेसळ; चीनचा मोठा हात, CSE चा खुलासा

चाचणीवेळी 13 पैकी केवळ 3 ब्रँडच पास होऊ शकले. मधातील अशाप्रकारची गंभीर भेसळ हे एक प्रकराचं फूड फ्रॉड आहे. मधाच्या चाचण्यांमध्ये पतंजली, डाबर, हितकारी, बैद्यनाथ, झंडु आणि एपिस हिमायल यांसारख्या मोठ्या ब्रँडचं मध NMR टेस्टमध्ये फेल ठरलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : भारतात प्राचीन काळापासून औषधी गुणधर्म असलेल्या मधाचा वापर केला जातो. मधमाशीपासून, फूलांच्या रसापासून तयार होणारा हा द्रव पदार्थ असल्याने त्याला अतिशय शुद्ध मानलं जातं. परंतु आता मधात अतिशय मोठ्या प्रमाणात भेसळ होत असून यात चीनचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सेंटर फॉर सायन्स अँड एनवॉयरनमेंट अर्थात CSE ने खुलासा केला आहे.

सीएसईने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच प्रमुख ब्रँडमध्ये मोठी भेसळ करण्यात येत आहे. या भेसळीत डाबर, पतंजली, झंडु, बैद्यनाथ अशा बड्या कंपन्यांचं नावही सामिल आहे. सीएसईनुसार, बाजारात विक्रीसाठी असणाऱ्या मधात शुगर सीरपची भेसळ केली जाते, जी आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे.

CSE च्या महासंचालक सुनिता नारायण यांनी सांगितलं की, मधासंबंधीचा हा रिपोर्ट भारत आणि जर्मनीच्या प्रयोगशाळेत झालेल्या एका अध्ययनावर आधारित आहे. त्यानंतर CSE नेही यासंबंधी तपास केला असता असं आढळलं की, भारतातील सर्व प्रमुख ब्रँडच्या मधात अतिशय मोठ्या प्रमाणात भेसळ आहे. यादरम्यान 77 टक्के नमून्यांमध्ये शुगर सीरपची भेसळ आढळली. या शुगर सीरपचा सप्लाय चीनची कंपनी अलीबाबा करत असल्याची माहिती आहे.

सुनिता नारायण यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील न्यूक्लियर मॅग्नेटिक रेजोनेन्स स्पेक्ट्रोस्कोपी (NMR) चाचणीअंतर्गत मधाची तपासणी करण्यात आली. या चाचणीवेळी 13 पैकी केवळ 3 ब्रँडच पास होऊ शकले. मधातील अशाप्रकारची गंभीर भेसळ हे एक प्रकराचं फूड फ्रॉड आहे. मधाची शुद्धता तपासण्यासाठी, भारतीय मानकांद्वारे अशाप्रकारची भेसळ पकडणं सोपं नाही. परंतु चीनी कंपन्या अशा प्रकराचं शुगर सीरप तयार करतात, जे भारतीय मानकांद्वारे सहजपणे पकडलं जाईल. ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत असल्याचं, सुनिता नारायण यांनी सांगितलं.

देशभरातील लोक सध्या कोरोनाशी लढा देत असून त्यातून बचावासाठी अद्याप कोणतंही ठोस औषध किंवा लस उपलब्ध नाही. या कठिण काळात जेवणात साखरेचं प्रमाणाहून अधिक सेवन अधिक हानिकारक ठरू शकतं, असं CSE ने म्हटलंय. त्याशिवाय कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भारतीय मधाचं अधिक सेवन करतायेत. अशात भेसळयुक्त मधामुळे वजन आणि लठ्ठपणा अधिक वाढू शकतो, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकत असल्याचं सुनिता नारायण यांनी सांगितलं.

CSE च्या चाचण्यांमध्ये पतंजली, डाबर, हितकारी, बैद्यनाथ, झंडु आणि एपिस हिमायल यांसारख्या मोठ्या ब्रँडचं मध NMR टेस्टमध्ये फेल ठरलं आहे. केवळ सफोला, मार्कफेड सोहना आणि नेचर्स नेक्टर मध सर्व चाचण्यांमध्ये पास झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

मध बनवण्यासाठी भेसळ करताना वापरलं जाणारं शुगर सीरप चीनमधून मागवलं जात असल्याचं CSE च्या चाचण्यांमध्ये समोर आलं आहे. त्यासाठी गोल्डन सीरप, इनवर्ट शुगर सीरप आणि राईस सीरपचा वापर केला जातो. ही माहिती समोर आल्यानंतर, चौकशीवेळी CSE ने चीनी कंपनी अलीबाबा पोर्टलचा तपास केला. या कंपनीने आपल्या जाहीरातींमध्ये, त्यांचं फ्रुक्टोज सीरप भारतीय चाचण्यांना पास करते असा खळबजनक दावा केला आहे.

दरम्यान, भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या मधाची NMR चाचणी 1 ऑगस्ट 2020 पासून अनिवार्य करण्यात आली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 3, 2020, 12:40 PM IST
Tags: patanjali

ताज्या बातम्या