साखरेची 'कडू' बातमी, खिश्याला बसणार कात्री!

साखरेची 'कडू' बातमी, खिश्याला बसणार कात्री!

साखरेमुळे मात्र सामान्यांचं तोंड कडू होण्याची शक्यता आहे. कारण, साखरेचा भाव हा 29 रूपये प्रति किलोवरून 31 रूपये होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

दिल्ली, 12 फेब्रुवारी : हंगामी आर्थिक बजेट सादर केल्यानंतर सरकारच्या निर्णयामुळे सामान्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे अनेकांचं तोंड गोड देखील झालं. प्रधाननंत्री किसान सन्मान योजनेमुळे बळीराजा देखील खूश झाला.

पण, आता साखरेमुळे मात्र सामान्यांचं तोंड कडू होण्याची शक्यता आहे. कारण, साखरेचा भाव हा 29 रूपये प्रति किलोवरून 31 रूपये होण्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजता कॅबिनेट सचिवांची बैठक झाली. त्यामध्ये साखरेचा भाव वाढण्यावर चर्चा झाल्याची एक्स्लुझिव्ह माहिती CNBC – आवाजला मिळाली आहे.

शेतकऱ्यांना होणार फायदा

शेतकऱ्यांचा विचार करता, उसाला योग्य भाव मिळावा या दृष्टीनं सरकार सध्या साखरेचा भाव वाढवण्याचा विचार करत आहे. सध्या साखर प्रति किलो 29 रूपये आहे. हीच किंमत वाढून 30 ते 31 रूपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे.

साखरेचा दर 35 रूपये प्रति किलो करण्याबाबत देखील चर्चा झाली. पण, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता त्यादृष्टीनं सरकार पावलं उचलू शकत नाही.

दरम्यान, साखरेचा भाव 30 ते 31 रूपये प्रति किलो करण्यासंदर्भातील पत्रक लवकरच बाहेर निघण्याची शक्यता आहे.

बजेटमध्ये सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

दरम्यान, हंगामी बजेट सादर करताना सरकारनं सामन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. टॅक्स मर्यादा वाढवल्यानं देखील सामन्यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केल्याचं पाहायाला मिळालं. पंतप्रधानरी किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांची मदत केली जाणार आहे. तिन हफ्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

साखर दरवाढीचा बळीराजाला फायदा?

साखर दरवाढ करून सरकार ऊसाला दर देण्याच्या दृष्टीनं पावलं टाकणार आहे. आजघडीला शेतकरी एफआरपीप्रमाणे दर द्या अशी मागणी करत आहे. साखर दरवाढ केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं मत जाणकारांनी व्यक्त केलं.

 

व्हिडीओ - स्टाईल, डायलॉगबाजीनंतर उदयनराजेंचं गाणं, हमे तुमसे प्यार कितना...

 

First published: February 12, 2019, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading