Sudeekasha Bhati Death: 'अपघात नाही माझ्या मुलीची हत्याच', छेडछाडीमुळे मृत्यू झालेल्या सुदीक्षाच्या वडिलांचा आरोप

Sudeekasha Bhati Death: 'अपघात नाही माझ्या मुलीची हत्याच', छेडछाडीमुळे मृत्यू झालेल्या सुदीक्षाच्या वडिलांचा आरोप

अमेरिकेत तब्बल 4 कोटींची स्कॉरलशिप मिळवलेली विद्यार्थी सुदीक्षा भाटीचा सोमवारी छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात अपघाती मृत्यू झाला. मात्र सुदीक्षाच्या वडिलांनी ही हत्या असल्याचे म्हटलं आहे.

  • Share this:

बुलंदशहर, 11 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एक धक्कादायक घटना घडली. अमेरिकेत तब्बल 4 कोटींची स्कॉरलशिप मिळवलेली विद्यार्थी सुदीक्षा भाटीचा सोमवारी छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात अपघाती मृत्यू झाला. मात्र सुदीक्षाच्या वडिलांनी ही हत्या असल्याचे म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न केल्याचेही सुदीक्षाच्या वडीलांनी सांगितले.

अभ्यासात हुशार असलेली सुदीक्षा भाटी दोन वर्षांपूर्वी इंटरमिजिएट परीक्षेत बुलंदशहर जिल्ह्यात प्रथम आली होती. त्यानंतर स्कॉलरशिपच्या जोरावर ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. मात्र कोरोनामुळे भारतात आलेल्या सुदीक्षाचा काही मुलांमुळे आपला जीव गमवावा लागला. सुदीक्षाचे वडील जितेंद्र भाटी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, "पोलिसांनी अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आहे. पोलीस घटनास्थळी जाऊन आले, तरी त्यांनी गुन्हा का नाही दाखल केला? पोलीस याला अपघात म्हणत आहेत, पण माझ्या मुलीची हत्या झाली आहे", असे सांगितले.

वाचा-अमेरिकेतून भारतात आलेली विद्यार्थीनी पडली छेडछाडीचा बळी, झाला अपघाती मृत्यू

काय म्हणाले पोलीस?

दुसरीकडे बुलंदशहर अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणाले की, औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये एका अपघाताची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. सुदीक्षा तिच्या काकांसोबत नातेवाईकांच्या घरी जात असल्याचे आढळून आले, हा अपघात तिथेच झाला.

वाचा-'एका तासाच्या आत मोदींना ठार करेन', एका फोन कॉलनं हादरलं पोलीस स्टेशन

काय घडलं नेमकं?

सोमवारी आपल्या काकांसोबत नातेवाईकांकडे स्कूटरवरून जात असताना बुलेटवरून काही मुलं सुदीक्षाचा पाठलाग करत होती. रस्त्यात बुलेटसवार मुलांनी सुदीक्षाची छेड काढण्यास सुरुवात केली. आरोपी युवक सतत बाइक ओव्हरटेक करत होती. त्याच दरम्यान या मुलांपासून वाचवण्याच्या नादात सुदीक्षानं अचानक गाडीला ब्रेक लावला आणि गाडी घसरली. यात सुदीक्षाचा जागीच मृत्यू झाला. सुदीक्षा 20 ऑगस्ट रोजी अमेरिकेत परतणारी होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात सुदीक्षा कोरोनामुळे मायदेशी परतली होती. मिळालेल्या माहितीनुसार सुदिक्षा भाटीनं 2018 मध्ये इंटरमीडिएटमध्ये बुलंदशहर जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले होते. त्यानंतर सुदिक्षाला HCLने 3 कोटी 80 लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती दिली, ज्याच्या जोरावर सुदीक्षा अमेरिकेतील बॉबसन कॉलेजमध्ये शिकत होती.

Published by: Priyanka Gawde
First published: August 11, 2020, 12:30 PM IST

ताज्या बातम्या