Elec-widget

सेलिब्रिटींची अशी होते राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती, हे आहे खरं कारण!

सेलिब्रिटींची अशी होते राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती, हे आहे खरं कारण!

म्हणूनच ज्येष्ठांचं सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यसभेला दिग्गजांचं सभागृहही म्हटलं जातं. राष्ट्रपती विविध क्षेत्रांतील दिग्गजांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त करतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक प्रतिभावंतांना राज्यसभेवर संधी मिळाली. राजकारणाच्या पाशात अडकलेल्या संसदेच्या कामकाजात वैविध्य निर्माण व्हावं, त्या त्या क्षेत्रातला अभ्यास असणारे लोक सभागृहात यावेत हा त्या मागचा उद्देश. त्यातून अनेक दिग्गज राज्यसभेत पोहोचले.

"लता मंगेशकर, श्याम बेनेगल, विनोद खन्ना, नर्गिस दत्त, सुनील दत्त, जावेद अख्तर, शबाना आजमी, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र, दारा सिंह, मिथुन चक्रवर्तीं, हेमामालिनी, जयाप्रदा, रेखा, जया बच्चन..."

बॉलिवूडचा पडदा गाजवणाऱ्या या तारांगणानं राज्यसभेचं सभागृहही प्रकाशमान केलंय. म्हणूनच ज्येष्ठांचं सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यसभेला दिग्गजांचं सभागृहही म्हटलं जातं. राष्ट्रपती विविध क्षेत्रांतील दिग्गजांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त करतात. या सदस्यांना राज्यसभेच्या कामकाजात सक्रिय सहभागही होता येतं. त्यांच्या क्षेत्राशी संबंधित विचार मांडून विविध समस्यांकडे लक्ष वेधता यावं हा यामागच उद्देश असतो. हे सदस्य राजकारणाच्या पाशात अडकलेल्या संसदेच्या कामकाजात वैविध्य निर्माण करतात. म्हणूनच त्यांची नियुक्ती कायम चर्चेचा विषय ठरते.

संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती कला, साहित्य, क्रीडा, विज्ञान आणि समाजकार्याला वाहून घेतलेल्या १२ व्यक्तींची राज्यसभेवर सहा वर्षांसाठी नियुक्ती करतात. १९५२ पासून 137 व्यक्तींना राज्यसभेवर नामनियुक्त करण्यात आलंय.

Loading...

राज्यसभेतलं तारांगण

लता मंगेशकर, श्याम बेनेगल, विनोद खन्ना, नर्गिस दत्त, सुनील दत्त, जावेद अख्तर, शबाना आजमी, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र, दारा सिंह, हेमामालिनी, जयाप्रदा, रेखा, जया बच्चन

आपल्या लेखणीनं लोकशाहीला बळकट करणाऱ्या अनेक पत्रकारांनाही राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली.

लेखणीचाही सन्मान

खुशवंत सिंग, कुलदीप नय्यर, एच. के. दुआ हे पत्रकारही राज्यसभेवर गेले.

राज्यसभेतले दिग्गज

डॉ. झाकिर हुसैन, राम जेठमलानी, पंडित रवीशंकर, एम. एफ. हुसैन, अमृता प्रीतम, डॉ. के. कस्तुरीरंगन, एम.एस. स्वामीनाथन, यांच्यासारखे कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, वकील सामाजिक क्षेत्रातील दिग्गज राज्यसभेत पोहोचले. तर राज्यसभेवरील नियुक्तीला नम्रपणे नकार देणाऱ्या पंडित भीमसेन जोशींही आठवल्या शिवाय राहात नाहीत.

क्रिकेटचं मैदान गाजवणारा भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि आपल्या सौदर्यानं अनेकांना घायाळ करणारी, अभिनयाच्या मोहात पाडणारी रेखा राज्यसभेत दाखल झाले पण त्यांची सभागृहातली उपस्थिती कायम चर्चेचा विषय ठरली.

त्याआधी गानकोकिळा लता मंगेशकर आणि इतर सेलिब्रिटींच्या कामगिरीचीही चर्चा झाली. पण, काही अपवाद वगळता सिनेसृष्टीतील बहुसंख्य खासदारांना राज्यसभेसारख्या ज्येष्ठांच्या सभागृहात संधी मिळूनही पडद्यावरचा ठसा उमटवता आला नाही हेही तितकंच खरं.

=================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2019 11:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...