मराठी बातम्या /बातम्या /देश /मुलगी झाली हो! मुलीच्या जन्माचा असाही सोहळा; हेलिकॉप्टरमधून चिमुकलीला आणलं घरी

मुलगी झाली हो! मुलीच्या जन्माचा असाही सोहळा; हेलिकॉप्टरमधून चिमुकलीला आणलं घरी

 अलीकडे मात्र परिस्थिती बदलत असून मुलींच्या जन्माचा आनंदही दिमाखदार पद्धतीनं साजरा केला जात आहे.

अलीकडे मात्र परिस्थिती बदलत असून मुलींच्या जन्माचा आनंदही दिमाखदार पद्धतीनं साजरा केला जात आहे.

अलीकडे मात्र परिस्थिती बदलत असून मुलींच्या जन्माचा आनंदही दिमाखदार पद्धतीनं साजरा केला जात आहे.

    राजस्थान, 25 एप्रिल : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता असलेल्या आपल्या देशात काही वर्षापूर्वी मुलगा हवा या अट्टाहासापोटी मुलींची गर्भातच किंवा जन्मताच हत्या करण्याचं प्रमाण प्रचंड होतं. अलीकडे मात्र परिस्थिती बदलत असून मुलींच्या जन्माचा आनंदही दिमाखदार पद्धतीनं साजरा केला जात आहे. यामुळं बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना संदेश दिला जात असून, सामाजिक बदलाला चालना मिळत आहे. राजस्थानातील (Rajasthan) एका खेड्यात नुकतचं मुलीच्या जन्माचं (Girl Child Birth) स्वागत इतक्या भव्यतेनं करण्यात आलं की सगळ्यांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. मुलीचा जन्म झाल्याचा आनंद अगदी हत्तीवरून साखर वाटून केल्याच्या घटनाही ऐकल्या आहेत; पण मुलीला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर (Helicopter) वापरण्याची घटना प्रथमच घडली आहे.

    राजस्थानमधील एका खेड्यात एका कुटुंबात तब्बल 35 वर्षांनी मुलीचा जन्म झाला. हा आनंद साजरा करण्यासाठी या नवजात बाळाला चक्क हेलिकॉप्टरमधून घरी आणण्यात आलं. हेलिपॅडवरून घरापर्यंत तिला आणेपर्यंत बँडपथक सोबत होतं. रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या, तर आई आणि बाळावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात येत होता. अतिशय भव्य अशा या स्वागत सोहळ्यासाठी या मुलीच्या वडिलांनी तब्बल साडेचार लाख रुपये खर्च केले.

    हे ही वाचा-तरुण शिक्षकाने तोडले सर्व विक्रम, UGC-NET परीक्षा तब्बल 6 विषयांत उत्तीर्ण

    राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील निंबडी चंदावाटा गावातील ही घटना असून, या मुलीचे आजोबा मदनलाल कुम्हार यांनी अत्यंत उत्साहानं आपल्या नातीचे स्वागत करण्यासाठी या भव्य सोहळ्याचे आयोजन केलं होतं. मदनलाल कुम्हार यांनी तिला हेलिकॉप्टरमधून घरी आणण्याचं ठरवलं. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली तसंच तिला तिच्या आईच्या माहेरच्या ज्या गावातून आणायचं होतं त्या गावात आणि आपल्या गावात तात्पुरते हेलिपॅड तयार करण्याचं काम केलं.

    30 मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत, एकाच वेळी अंत्यसंकार, बीडचा VIDEO

    दोन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या या चिमुकलीचं रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या आईच्या माहेरच्या गावातून वडिलांच्या घरी आगमन झालं. दोन्ही खेड्यांमधील 30 किलोमीटरचं अंतर हेलिकॉप्टरनं सुमारे 20 मिनिटांत पार केलं. गावात हेलिकॉप्टर उतरताना बघण्यासाठी आणि मुलीची एक झलक बघण्यासाठी गावकरीही उपस्थित होते. आनंदानं, उत्साहानं मुलीच्या जन्माच्या शुभेच्छांच्या जयघोषात चिमुरडीचे वडील हनुमान राम प्रजापत यांनी आपल्या चिमुकल्या मुलीला आपल्या हातात घेतलं आणि ते हेलिकॉप्टरमधून खाली उतरले. ‘माझ्या नवजात मुलीला हेलिकॉप्टरमध्ये आणून, मुलीचा जन्म एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करावा हाच संदेश मला समाजाला द्यायचा आहे,’ असं त्यांनी या वेळी सांगितलं.

    राजस्थानमधील ग्रामीण भागात राहणाऱ्या या कुटुंबानं आपल्या मुलीला हेलिकॉप्टरमधून आणून तिच्या जन्माचा आनंद साजरा केला ही अतिशय उल्लेखनीय घटना असून, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं त्यांनी एक उत्कृष्ट उदाहरण निर्माण केलं आहे, यात शंका नाही.

    First published:

    Tags: Daughter, Positive story, Rajasthan