Amazonia Mission:नवीन वर्षातील इस्रोची पहिली कामगिरी यशस्वी, अंतराळात भगवतगीता अन् मोदींचा फोटो

Amazonia Mission:नवीन वर्षातील इस्रोची पहिली कामगिरी यशस्वी, अंतराळात भगवतगीता अन् मोदींचा फोटो

ब्राझीलच्या ॲमेझोनिया-१ या उपग्रहाला घेऊन ‘पीएसएलव्ही सी-५१’ (PSLV-C51)अवकाशात जात आहे. त्याशिवाय इतर १८ उपग्रहांनाही अवकाशातील त्यांच्या नियोजित कक्षेत सोडले जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) २०२१ मधील पहिलं प्रक्षेपण यशस्वीरित्या केलं आहे. रविवारी सकाळी १०.२४ वाजता श्रीहरीकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून हे प्रक्षेपण झालं. चेन्नईपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या प्रक्षेपण पॅडमधून प्रथमच भारतीय रॉकेट ब्राझीलच्या ६३७ किलो वजनाच्या अमेझोनिया -१ (Amazonia 1) उपग्रहाचं प्रक्षेपण करत आहे.

ब्राझीलच्या ॲमेझोनिया-१ या उपग्रहाला घेऊन ‘पीएसएलव्ही सी-५१’ (PSLV-C51)अवकाशात जात आहे. त्याशिवाय इतर १८ उपग्रहांनाही अवकाशातील त्यांच्या नियोजित कक्षेत सोडले जाणार आहे.  या उपग्रहाला सतीश धवन उपग्रह किंवा एसडी सॅट असं नाव देण्यात आलं आहे. याद्वारे २५,००० लोकांची नावं अंतराळात पाठवणार आहे. नॅनो सॅटेलाइटमध्ये भगवतगीतेची एक प्रत एसडी कार्डच्या रूपात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वरच्या पॅनेलवर कोरले आहे. हा त्यांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमासाठी आणि अवकाश खासगीकरणासाठीच्या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा प्रयत्न आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के शिवन आणि वैज्ञानिक सचिव डॉ. आर उमामहेश्वरन यांची नावे तळावरील पॅनेलवर कोरलेली आहेत.

ॲमेझोनिया 1 चं वजन 637 किलोग्राम इतकं असून हा ब्राझीलचा पहिला उपग्रह आहे, जो भारतातून प्रक्षेपित झाला आहे. अ‍ॅमेझोनिया -1 संदर्भात इस्रोने निवेदनात म्हटलं आहे की, हा उपग्रह अॅमेझोन प्रदेशातील जंगलतोड व ब्राझिलियन प्रदेशातील विविध शेतीच्या विश्लेषणासाठी डाटा गोळा करेल आणि पायाभूत सुविधा आणखी मजबूत करेल. प्रक्षेपणाचं थेट प्रसारण इस्रोच्या वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक आणि ट्वीटर वाहिन्यांवर थेट पाहाता येऊ शकतं.

Published by: Kiran Pharate
First published: February 28, 2021, 12:10 PM IST

ताज्या बातम्या