Success Story: अमेरिकेतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून या मुलांसाठी समीना बानो आली भारतात

Success Story: अमेरिकेतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून या मुलांसाठी समीना बानो आली भारतात

समीना बानो यांना अमेरिकेत गलेलठ्ठ पगाराची नोकरी होती पण ही नोकरी करताना त्यांच्या मनात रुखरुख होती. त्यांना वाटत होतं, त्या दुसऱ्या देशासाठी मेहनत करतायत. आपल्या देशात जाऊन त्याच्या विकासात योगदान दिलं पाहिजे...

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : तुम्हाला लाखोंचा पगार मिळत असेल तर ती नोकरी सोडण्याचा विचार तुम्ही क्वचितच कराल. त्यातही ही नोकरी जर अमेरिकेसारख्या देशातली असेल तर ती सोडणं कठीणच. पण समीना बानो यांनी अशी गलेलठ्ठ पगाराची अमेरिकेतली नोकरी सोडली आणि भारतात येऊन गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली.

समीना बानो यांचे वडील हवाई दलात असल्यामुळे त्यांचं शिक्षण देशाच्या वेगवेगळ्या भागात झालं. त्यांनी बंगळुरूमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली. इथे पदवी घेतल्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या. तिथे त्यांना चांगली नोकरी मिळाली. ही नोकरी करतानाच त्यांना वाटत होतं, त्या दुसऱ्या देशासाठी मेहनत करतायत. आपल्या देशात जाऊन त्याच्या विकासात योगदान दिलं पाहिजे.

स्वदेशी परत

समीना यांनी घरी परतण्याचा ध्यास घेतला होता. अखेर 2012 मध्ये त्यांनी ती नोकरी सोडली आणि भारताची वाट धरली.समीना यांना भारतात परतलेलं पाहून त्यांच्या आईवडिलांनाही धक्का बसला. पण समीना यांचा निर्णय झाला होता. गरीब मुलांचं भवितव्य घडवण्याचं त्यांचं स्वप्न होतं.

अभ्युदय फाउंडेशनची स्थापना

समीना लखनौमध्ये आल्या आणि तिथे त्यांनी काम सुरू केलं. शिक्षण, आरोग्य, शेती या विषयातले तज्ज्ञ विनोद यादव यांची त्यांना मदत झाली. त्यांच्या मदतीने समीना यांनी भारत अभ्युदय फाउंडेशनची स्थापना केली. त्यांनी गरीब वस्तीत राहणाऱ्या 50 मुलांना शिकवण्याचं काम सुरू केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे केवळ दीड वर्षांत 50 जिल्ह्यांतल्या 20 हजार गरीब मुलांनी खाजगी शाळेत प्रवेश घेतला.

(हेही वाचा : Parle G : 2 महिन्यांपूर्वी 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात, आता 55 कोटींनी वाढला नफा)

कायदेशीर लढाई जिंकली

समीना यांच्या या मोहिमेला मोठमोठ्या शाळांच्या व्यवस्थापनांनी विरोध केला. याविरुद्ध त्यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात कायदेशीर लढाई दिली. यामध्ये त्यांचा विजय झाला आणि मुलांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळाले. हळूहळू प्रवेशाचा हा आकडा वाढतच गेला. समीना यांच्या प्रयत्नांमुळे आता शेकडो गरीब मुलांसाठी शिक्षणाची दारं खुली झाली आहेत.

==================================================================================

VIDEO: दबक्या पावलांनी केला वार, पाहा दोन वाघांमधील लढाईचा थरार

First published: October 16, 2019, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading