एका IRS अधिकाऱ्याची यशोगाथा! मागासलेल्या गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये केले रुपांतर, आता 100 गावांचे लक्ष्य

एका IRS अधिकाऱ्याची यशोगाथा! मागासलेल्या गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये केले रुपांतर, आता 100 गावांचे लक्ष्य

त्यांना गावाचं शहर करायचं नव्हतं, तर गावकऱ्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात हा हेतू होता

  • Share this:

धौलपुर, 22 मे : राजस्थानातील धौलपुर जिल्ह्यातील धनौरा या गावाचं नशीब एका अधिकाऱ्यानं बदलून दाखविले आहे. हे राज्यातील पहिलं गाव आहे ज्याला स्मार्ट गावाचा किताब मिळाला आहे. सगळ्या शहरी सुविधा उपलब्ध झाल्या तरी धानौराच्या गावपणाच्या गाभ्याला जराही धक्का बसलेला नाही, हे विशेष.

धानौरा गावात सर्व शहरातील सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी आत्मा हा गावपणाचाच आहे. या गावाचं नशीब बदलणारे आरएएस अधिकारी डॉ. सत्यपाल सिंह मीणा म्हणतात की, मला गावाचं रुपांतर शहरात करायचं नाही. शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा या धनौरा गावातील ग्रामस्थांना मिळाव्यात एवढीच माझी इच्छा आहे. आणि हे करताना गावाचं मूळ स्वरुप बदलण्याची काहीही गरज नाही.

जाणून घेऊयात धनौरा गावाविषयी आणि त्याचं नशीब पालटणऱ्या डॉ. सत्यपाल सिंह मीणा या अधिकाऱ्याविषयी

कोण आहेत डॉ. सत्यपाल सिंह मीणा

सत्यपाल सिंह मीणा हे सध्या आयकर विभागात अतिरिक्त संचालक या पदावर कार्यरत आहेत. सत्यपाल सिंह यांचा जन्म धनौरा या गावात झाला होता. त्यांचं लहानपणही याच गावात गेलं. सनदी सेवेत दाखल होण्याचं त्यांचं कधी स्वप्न नसल्याचं ते सांगतात. नंतर काळाच्या ओघात सनदी सेवेचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं. शिक्षणाच्या काळात गाव आणि शहरातील अंतरही त्यांच्या लक्षात आलं. हे अंतर दूर करण्याचा संकल्प त्यांनी केला, आणि याच कारणासाठी त्यांनी धनौरा गावाची निवड केली.

कशी केली सुरुवात ?

2015 सालापर्यंत धनौरा गावात रस्ते होते ना शौचालयं, गावात फक्त काही जुने वाडे दिसत, तेही कधीली पडतील अशा जीर्ण अवस्थेत होते. एक मागासलेलं गाव कसं असू शकेल, याचं उत्तम उदाहरण होतं धनौरा. हळूहळू गावात बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. ‘विचार बदला, गाव बदला’ ही नवी घोषणा गावकऱ्यांमध्ये रुजवली. या बदलासाठी ग्रामस्थांनाच स्वयंसेवक म्हणून तयार करण्यास सुरुवात केली. सत्यपाल सिंह सांगतात की लक्ष्य हे होते की या गावाच्या विकासाच्या मॉडेलला चळवळीत रुपांतरीत कसं करता येईल, यामुळे गावाबाबत असलेली जबाबदारीही ग्रामस्थांच्या लक्षात येईल. गावाला स्वालंबी कसे करता येईल, यासाठी विचार सुरु झाला. सर्व योजना कार्यान्वित करण्यासाठी गावातील सुमारे तीन हजार ग्रामस्थांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदवला.

आता कसं आहे गावाचं स्वरुप

या बदलाच्या प्रक्रियेत आता धनौरा गावात सभागृह, प्रशस्त रस्ते, सर्व घरांमध्ये शौचालयं तयार झाली आहेत. यासाठी जमिनीतून आवश्यक त्या जोडण्या करण्यात ल्या आहेत. गावात मानवनिर्मिती ३ किलो मीटरचा तलाव निर्माण करण्यात आला आहे, आठ निरनिराळ्या टाक्यांनी हे तलाव जोडण्यात आला आहे. रस्त्यांवरील दिवाबत्तीसाठी सौरउर्जेवर चालणारे दिवे बसविण्यात आले आहेत. शाळेत मुलींसाठी आधुनिक शौचालय तयार करण्यात आलंय. मुलांना संगणाचं शिक्षण मिळावं याची व्यवस्था करण्यात आलीये. गावाचे डिजिटल मॅपिंगही करण्यात आलंय. या आधारे गावात काँक्रिटचे रस्तेही बांधण्यात आले आहेत. डिजिटल मॅपिंगमुळे गावात उतार कोणत्या बाजूला आहे, याचीही माहिती मिळाली, यामुळे गटारांची कामे करणेही सोपे झाले.

आता पुढचे लक्ष्य काय

आता धौनारा गावाप्रमाणेच इतर काही गावांचे चित्र बदलण्यासाठी डॉ. सत्यपाल मीणा हे कार्यरत आहेत. विचार बदला, गाव बदलेल या नव्या अभियानांतर्गत इतर गावांतील बदलांसाठी ते प्रयत्न करतायेत. प्रत्येक वेळेला एकच मॉडेल सर्व गावांत सारखेच लागू होणार नाही, असे ते सांगतात. ज्या गावात ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा लक्ष दिले जाते.

हे वाचा -महाराष्ट्र पुन्हा हादरला! कोरोनामुळे ठाण्यात पहिल्या महिला पोलिसाचा मृत्यू

First published: May 22, 2020, 7:12 AM IST
Tags: village

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading