वडोदरा, 31 ऑक्टोबर: परदेशात सर्वस्व गमावून स्वतःच्या (Success story of a pizza maker) शहरात परतलेल्या आणि पिझ्झा विकून पुन्हा लखपती झालेल्या उद्योजकाची सध्या जोरदार चर्चा आहे. गुजरातमधल्या वडोदरात राहणारे बिजल दवे हे (Bijal Dave opened Pizza house) अऩेक वर्ष परदेशात राहत होते. परदेशात खाल्लेले टक्केटोणपे आणि आलेले अनेक अनुभव यांच्या आधारावर त्यांनी स्वतःचं एक विश्वही तयार केलं होतं. मात्र काही कारणांमुळे हे (Zero to Hero) विश्व उद्धस्त झालं आणि त्यांना मायदेशी परतावं लागलं.
1992 साली सोडला देश
कॉम्प्युटर डिप्लोमाचा कोर्स केल्यानंतर चांगल्या नोकरीच्या शोधात बिजल यांनी देश सोडला. एका मित्रासोबत ते केनियाला गेले आणि नोकरी शोधू लागले. मात्र त्यांना मनासारखी नोकरी काही मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी एक हॉटेलमध्ये काम सुरू केलं आणि पोटापाण्याची सोय केली. सुरुवातीला हॉटेलमध्ये ते पडेल ते काम करायचे. अगदी भांडी घासणं, टेबल पुसणं असल्या मूलभूत कामांपासून त्यांनी सुरुवात केली. मात्र जे काम करू ते उत्तम करण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्या कामाची हॉटेलच्या मालकावर छाप पडली आणि थोड्याच दिवसांत त्यांना फ्रंट ऑफिसचं काम मिळालं. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन कांगोतील एका हॉटेल व्यावसायिकाने त्यांना ऑफर दिली.
कांगोमध्ये घडलं करिअर
ती ऑफर स्विकारत त्यांनी कांगोला मुक्काम हलवला. तिथे पिझ्झा करण्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं. त्यांचं कसब पाहून हॉटेलच्या व्यवस्थापनाने त्यांना खास ट्रेनिंगसाठी इटलीला पाठवलं. त्यानंतर अनेक वर्ष ते कांगोमध्ये पिझ्झा बनवत राहिले. हळूहळू ते त्या हॉटेलचे पार्टनरही झाले.
दुर्घटनेनं केलं होत्याचं नव्हतं.
सर्व काही सुरळीत सुरू असतानाच त्यांच्या हॉटेलला आग लागली आणि त्यांची सगळी गुंतवणूक जळून खाक झाली. आजवरची बहुतांश कमाई त्यांनी आपल्या हॉटेलमध्येच गुंतवली असल्यामुळे त्यांच्याकडे काहीच बाकी उरली नाही. अखेर सगळा गाशा गुंडाळून त्यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय़ घेतला.
हे वाचा- लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा, '...तर तुम्हालाही मिळणार Local Ticket'
वडोदरात सुरु केला उद्योग
वडोदरात परतल्यानंतर त्यांनी तिथं इटालियन पिझ्झा विकायला सुरुवात केली. सुरुवातीला केवळ पिक-अप ऑर्डरसाठी ते पिझ्झा बनवायचे. मात्र त्यांच्या पिझ्झाची ख्याती वाढत गेली आणि त्यांनी आउटलेट सुरु केलं. त्यांचा हा व्यवसाय सध्या जोमाने वाढत असून शून्यातून नवं विश्व त्यांनी उभं केलं आहे. तुमच्याकडे कुठलंही कौशल्य असेल, तर तुम्ही अनेकदा शून्यातून जग निर्माण करू शकता, असं ते सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.