Success Story : आईवडिलांनी काढलं घराबाहेर पण तो होणार देशातला पहिला समलिंगी पायलट

Success Story : आईवडिलांनी काढलं घराबाहेर पण तो होणार देशातला पहिला समलिंगी पायलट

अ‍ॅडम सांगतो, मी जोहान्सबर्गच्या प्रशिक्षणानंतर घरी परतत होतो तेव्हाच माझ्या कुटुंबीयांना मी समलिंगी असल्याचं कळलं. त्यानंतर एक वर्ष माझ्याशी घरचे लोक चांगलं वागले नाहीत. एवढंच नाही तर ते मला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन गेले. तिथे माझ्यावर चुकीचे उपचार झाले. त्यानंतर मला घरातून काढून टाकलं.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : आपल्या देशात समलिंगी संबंधांना कायद्याने मान्यता मिळाली आहे पण अजूनही समाज अशा व्यक्तींचा स्वीकार करत नाही. अनेक समलिंगींना तर घरातच या विरोधाचा सामना करावा लागतो. अशीच एक कहाणी आहे केरळच्या अ‍ॅडम हॅरीची. ज्या अ‍ॅडमला तो समलिंगी असल्याने त्याच्या आईवडिलांनी घराबाहेर काढलं होतं तो आता देशातला पहिला समलिंगी वैमानिक होणार आहे.

अ‍ॅडमला पहिल्यापासूनच वैमानिक व्हायचं होतं. यासाठी त्याने प्रशिक्षणही घेतलं होतं. त्याला 2017 मध्ये जोहान्सबर्गमधल्या प्रशिक्षणानंतर परवानाही मिळाला. त्याला कमर्शिअल पायलट बनायचं होतं पण हे तो घरी सांगणार तेवढ्यात त्याच्या लैंगिकतेबद्दल घरच्यांना कळून चुकलं होतं.

अ‍ॅडम सांगतो, मी जोहान्सबर्गच्या प्रशिक्षणानंतर घरी परतत होतो तेव्हाच माझ्या कुटुंबीयांना मी समलिंगी असल्याचं कळलं. त्यानंतर एक वर्ष माझ्याशी घरचे लोक चांगलं वागले नाहीत. एवढंच नाही तर ते मला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन गेले. तिथे माझ्यावर चुकीचे उपचार झाले. त्यानंतर मला घरातून काढून टाकलं.

रस्त्यावर काढल्या रात्री

अ‍ॅडम सांगतो, घरातून मी रिकाम्या हाताने बाहेर पडलो होतो. मग रस्त्यावरच रात्री काढल्या. माझ्याकडे खायलाही पैसे नव्हते. कित्येक वेळा मी रात्री भुकेलाच झोपी जात होतो.

मी पोट भरण्यासाठी ज्यूसच्या दुकानात नोकरी करू लागलो पण इथेही मी समलिंगी असल्यामुळे भेदभावाला सामोरा गेलो. मी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. तिथे मला एव्हिएशन अ‍ॅकॅडमीमध्ये जाण्याचा सल्ला मिळाला.

(हेही वाचा : रिक्षापासून ते हवाई प्रवासही होणार स्वस्त, मोदी सरकार घेणार मोठा निर्णय)

केरळ सरकारची मदत

पायलट बनण्यासाठी हॅरीला केरळ सरकारने मदत केली. सामाजिक न्याय विभागाने यासाठी त्याला सुमारे 23 लाख रुपयांची मदत केली. यामुळे हॅरीने तिरुवनंतपुरमच्या राजीव गांधी अ‍ॅकॅडमी फॉर एव्हिएशन टेक्नॉलॉजीमध्ये 3 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अ‍ॅडमिशन घेतली.

केरळ सरकारने दिलेल्या स्कॉलरशिपबद्दल हॅरीने सरकारचे आभार मानले आहेत. असं असलं तरी माझ्या आयुष्याचा संघर्ष अजून संपलेला नाही, असं तो म्हणतो. एव्हिएशन अ‍ॅकॅडमीचा फॉर्म भरताना लिंग नमूद करण्याची अडचण होती. त्यावेळी बिजू प्रभाकर यांनी अ‍ॅकॅडमीला एक पत्र लिहिलं आणि माझ्या प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा झाला, असं तो सांगतो.

==============================================================================================

मुख्यमंत्री फडणवीसांकडून नारायण राणेंचं तोंडभरून कौतुक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 04:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading