News18 Lokmat

संसदेत कामकाज नाही पण मी पगार घेणारच!-सुब्रम्हण्यम स्वामी

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं . या अधिवेशनात 23 दिवस काहीच कामकाज झालं नाही . हे कामकाज न होण्याचं खापर सरकारने विरोधकांवर फोडलं

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2018 07:28 PM IST

संसदेत कामकाज नाही पण मी पगार घेणारच!-सुब्रम्हण्यम स्वामी

4 एप्रिल:   संसदेत 23 दिवस काम झालं नसलं तरी आपण पगार घेणारच अशी  ताठर भूमिका भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी घेतली आहे.  ही भूमिका भाजपच्या इतर खासदारांनी घेतलेल्या खासदारांहून वेगळी आहे.

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं . या अधिवेशनात 23 दिवस काहीच कामकाज झालं नाही . हे कामकाज न होण्याचं खापर सरकारने विरोधकांवर फोडलं. सरकारने विरोधकांना असहिष्णूही ठरवलं. पण हे 23 दिवस काम झालं  नाही.

यामुळे या 23 दिवसांचा पगार  भाजप आणि एनडीएच्या इतर खासदारांनी घेऊ नये असं आव्हान भाजपचे खासदार  अनंतकुमार यांनी केलं आहे.  पण याचा विरोध सुब्रम्हण्यम स्वामींनी केलाय. आपण 23 दिवस दररोज संसदेत जात होतो. संसदेत 23 दिवस कामकाज झालं नाही यात माझी काहीच चूक नाही.   त्यामुळे जोपर्यंत राष्ट्रपती सांगत नाहीत तोपर्यंत मी काही पगार घेणं थांबवणार नाही. बाकी भाजप एनडीएच्या खासदारांनी तसं ठरवलं असेल तर त्यांना तसं करू देत. असं सडेतोड उत्तरच त्यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2018 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...