Home /News /national /

आपल्याच पक्षाच्या IT सेलवर भडकले भाजपचे खासदार, केला गंभीर आरोप

आपल्याच पक्षाच्या IT सेलवर भडकले भाजपचे खासदार, केला गंभीर आरोप

'माझ्यावरच्या सोशल मीडियावरच्या हल्ल्यांना जसे भाजप जबाबदार नाही, तसे माझ्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यांनाही मी जबाबदार राहणार नाही.'

    नवी दिल्ली 07 सप्टेंबर: सर्व राजकीय पक्षांमध्ये भाजपचा आयटी सेल (BJP IT Cell) जास्त सक्रिय असल्याचं म्हटलं जातं. डिजिटल माध्यमांचा (Digital Media) पुरेपूर वापर करत पक्षाचं धोरण मांडण्यासाठी सगळ्या आधुनिक साधनांचा वापर केला जातो. त्यासाठी प्रत्येक पक्षाने आयटी सेलची निर्मिती केली आहे. आता याच आयटी सेलविरुद्ध सोशल मीडियावर वारंवार टीका केली जाते. भाजपजे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी (BJP MP Subramanian Swamy ) आपल्याच पक्षाच्या आटीसेलवर भडकले आहेत. ट्रोल्सला आवरा नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा असा इशाराच त्यांनी दिला. त्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. भाजपचे खासदार असले तरी सुब्रम्हण्यम स्वामी हे थेट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा त्यांच्या भूमिकेमुळे पक्षच अडचणीत येत असतो. याही वेळी त्यांनी आयटी सेलचे वाभाडे काढले आहेत. ते म्हणाले, भाजपचा आयटी सेल चुकीच्या मार्गाने काम करत आहे. वेगळं मत व्यक्त केल्याने भाजपचे ट्रोल्स माझ्यावर वयक्तित हल्ले करत आहेत. भाजपने या ट्रोल्सला आवर घातला पाहिजे. नाही तर माझे समर्थकही त्यांना त्याच भाषेत उत्तर देतील. माझ्यावरच्या हल्ल्यांना जसे भाजप जबाबदार नाही, तसे माझ्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यांनाही मी जबाबदार राहणार नाही असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. स्वामी यांच्या या टीकेनंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काँग्रस सहीत अनेक राजकीय पक्ष भाजपच्या आयटी सेलवर कायम टीका करत असतात. आता पक्षाच्याच दिग्गज नेत्याने पक्षाला आरसा दाखवला आहे. या भाजपच्या ट्रोलर्सवर अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणीही सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या