हैदराबाद, 22 फेब्रुवारी : नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून अजूनही देशभरात आंदोलनं सुरू आहेत. यासगळ्यात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. हैदराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात सुब्रमण्यम यांनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचंच भारतीय नागरिकत्त्व लवरकरच रद्द होईल, असा अजब दावा केला आहे. 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हैदराबाद विद्यापीठात 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात “CAA – a historical imperative beyond contemporary politics” या विषयावर बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाचे उदाहरण देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तसेच, गृहमंत्री अमित शाहा यांच्या टेबलवर या दोघांच्या फाईल असल्याचा अजब खुलासाही यावेळी केला. आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (ABVP) आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वामी बोलत होते.
वाचा-CAAवरून काँग्रेसने साधला CM उद्धव ठाकरेंवर निशाणा
वाचा-शिवसेनेचं पुन्हा चलो अयोध्या, या दिवशी उद्धव ठाकरे घेणार रामललांचे दर्शन
‘भारतीय असताना इतर देशांचे नागरिकत्व घेतात’
या कार्यक्रमादरम्यान बोलताना स्वामी यांनी CAAला विरोध करणाऱ्यांवर निशाना साधत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. स्वामी यांनी भारतीय संविधानाचा हवाला देत, “जे नागरिक इतर भारतीय असताना इतर देशांचे नागरिकत्त्व घेतात, त्याचे नागरिकत्त्व रद्द केले जाते”, असे सांगितले. यावेळी बोलताना स्वामी यांनी दावा केला की राहुल गांधी यांच्याकडे इंग्लंडचे नागरिकत्त्व आहे. त्यामुळं दोन देशांचे नागरिकत्त्व ठेवणे बेकायदेशीर आहे, असे सांगत राहुल गांधींवर टीका केली.
वाचा-'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेवरून नवा ट्विस्ट, काय म्हणाले खासदार अमोल कोल्हे
वाचा-शरद पवारांनी केलं CM उद्धव ठाकरेंचं तोंड भरून कौतुक, म्हणाले...
‘CAAला विरोध करणाऱ्यांना त्याबाबत माहितीच नाही’
स्वामी यांनी राहुल गांधींवर टीका केल्यानंतर सुधारित नागरिकत्त्व कायद्यावरही भाष्य केले. CAAला लोकसभेत आणि राज्यसभेत संमती मिळाल्यानंतर काही राज्यांनी मात्र हा कायदा लागू करण्यास नकार दिला. एवढेच नाही तर गेले कित्येक महिने दिल्ली, मुंबई, कोलकाता सारख्या शहरांमध्ये CAA विरोधात आंदोलने होत आहेत. स्वामी यांनी कायद्याला विरोध करणाऱ्यांना मुळात कायद्याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले आहे. तसेच, भारतीय मुस्लिमांना सुधारित नागरिकत्त्व कायद्यामुळे कोणतीही अडचण होणार नाही, असेही स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Caa, Rahul gandhi, Sonia gandhi, Subramanian swamy