देशाला शुद्ध करण्यासाठी पुन्हा भाजपलाच निवडून द्या- सुब्रह्मण्यम स्वामी

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 09:01 PM IST

देशाला शुद्ध करण्यासाठी पुन्हा भाजपलाच निवडून द्या- सुब्रह्मण्यम स्वामी

पिंपरी, 24 मार्च: 'तेव्हा एअर स्ट्राईक होणार आहे हे माहीत नव्हते म्हणून मी राम मंदिर झाल्याशिवाय सरकार येणार नाही' असं म्हटलं होतं, असं सांगत भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला.

'आता मात्र देशात पुन्हा सरकार आलं की राम मंदिरही उभारलं जाईल आणि 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणी काँग्रेसचे सगळे नेते जेलमध्ये जातील आणि त्यांची संपत्तीही जप्त होईल, असं स्वामी यांनी विधान केलं आहे. पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या दक्षिण भारतीयांच्या राज्य कार्यकारणी बैठकीदरम्यान ते बोलत होते. भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींनी लादेनला मारणाऱ्या अमेरिकेकडे पुरावे का मागितले नाही? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. राफेलसह येडीयुरप्पांच्या डायरीवरुन आरोप करण्यापेक्षा पुरावे असतील तर राहुल गांधी न्यायालयात का जात नाहीत? असा सवाल करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.


'मनमोहन सिंग सर्कशीतील सिंह'

यावेळी स्वामी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्कशीतील सिंह म्हणूनही संबोधलं. एव्हढंच नाही तर पुन्हा एकदा देशाचं पुनरुत्थान करण्याची वेळ आली असून, देशात कित्येक वर्षांपासून कचऱ्यासारखे जमलेल्यांना बाहेर काढायची गरज असल्याचे ते म्हणाले. देशाला शुद्ध करण्यासाठी पुन्हा भाजपला निवडून देण्याचंही आवाहन करत स्वामींनी वादग्रस्त विधान करण्याची परंपरा कायम ठेवली.

Loading...


VIDEO: 'राहुल शेवाळेंना आर्शिवाद आहेच पण उद्धव ठाकरेंचा आशिर्वाद मला पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 09:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...