Home /News /national /

महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या खांद्यावर दिल्लीची जबाबदारी? IPS अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या खांद्यावर दिल्लीची जबाबदारी? IPS अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

कडक शिस्त आणि सचोटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जयस्वाल यांनी केंद्रीय गृप्तचर संस्था IB आणि RAWमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलं आहे.

    नवी दिल्ली, 27 जानेवारी: महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या खांद्यावर लवकरच दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र केडरच्या 1985 च्या बॅचचे अधिकारी असलेले सुबोधकुमार जयस्वाल दिल्लीचे पोलीस आयुक्त होणार ही बातमी समोर येताच अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडालीय. कडक शिस्त आणि सचोटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जयस्वाल यांनी केंद्रीय गृप्तचर संस्था IB आणि RAWमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलं आहे. त्यांचा अनुभव आणि ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयानं जयस्वाल यांचं नाव निवडणूक आयोगाकडे पाठवलं आहे. दिल्लीत सध्या निवडणूक सुरू असल्यानं आयोगाची परवानगी घेणं गरजेचं आहे. निवडणूक आयोग यासंदर्भातला निर्णय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. दिल्लीचे सध्याचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक हे  31 जानेवारीला निवृत्त होत आहेत. सुबोध जायस्वाल याचं नाव समोर आल्यानं यूटीच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडालीय. कारण दिल्ली पोलीस आयुक्तपदी यूटी (युनियन टेरेटरी)  कॅडर च्या वरिष्ठ आइपीएस अधिकाऱ्यांचीच नियुक्ती केली जाते. 1999मध्ये केंद्र सरकारनं उत्तर प्रदेश कॅडरच्या अजय राज शर्माना आयुक्त बनवलं होतं.दिल्ली पोलीस आयुक्तपद काही वर्षापूर्वी डीडी रँकचं झालं. डीजीच्या नियुक्तीचा अधिकार गृहमंत्रालयाकडे आहे. त्यात कॅडरची वरिष्ठता डावलली गेली नाही तर न्यायालयालाही हस्तक्षेप करता येत नाही. कोण आहेत सुबोधकुमार जयस्वाल? नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधिक्षक म्हणून धडाकेबा कामगिरी नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांविरोधात अनेक मोठे ऑपरेशन राबवले 20 हजार कोटी रुपयांच्या महाराष्ट्रात गाजलेल्या स्टँप घोटाळ्याची जयस्वालांकडून चौकशी महाराष्ट्र एटीएसची जबाबदारी असताना मालेगाव बॉम्बस्फोटाची चौकशी सुबोधकुमार जयस्वाल सध्या राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केलंय. त्यांनी RAW आणि IB या  गुप्तचर संस्थेत 10 वर्ष महत्त्वाच्या पदावर काम केलंय. 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात ते सहभागी होते. प्रजासत्ताक दिनी ड्युटी करून घरी परतले अन् काही तासानंतर आढळला पोलिसाचा मृतदेह
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Delhi, Delhi assembly election, Maharashtra police

    पुढील बातम्या