Home /News /national /

राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार यांची CBI संचालकपदावर नियुक्ती

राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार यांची CBI संचालकपदावर नियुक्ती

Subodh Kumar Jaiswal: महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल सीबीआयच्या अध्यक्षपदावर.

    नवी दिल्ली, 25 मे: राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची सीबीआयच्या महासंचालकपदावर (New Director of CBI) वर्णी लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयचे प्रमुखपद हे रिक्त होते अखेर त्या जागेवर सुबोधकुमार जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सुबोधकुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांचे नाव सीबीआय महासंचालक पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कठित सोमवारी एका उच्चस्तरीय समितीने सीबीआयच्या महासंचालकपदासाठी काही नावांची यादी तयार केली होती. या यादीमध्ये सीआयएसएफचे महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, सशस्त्र सीमा बलचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा आणि केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष सचिव असलेले व्ही. एस. के.य कौमुडी यांच्या नावाचा समावेश होता. "भाजपनं जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल" कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?  सुबोध कुमार जयस्वाल हे आधी मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यानंतर सुबोधकुमार जयस्वाल हे राज्याचे पोलीस महासंचालक बनले सुबोधकुमार जयस्वाल यांनी केंद्रात आणि रॉमध्ये सुद्धा काम केलं आहे. 1985च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत रॉ आणि आयबी या गुप्तचर संस्थेत त्यांनी 10 वर्षे काम केलं आहे. 2006 साली झालेल्या मुंबईतील बॉम्ब स्फोटाच्या तपास पथकातही सुबोधकुमार सहभागी होते सीबीआयच्या महासंचालक पदावर सुबोधकुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यापूर्वी सीबीआयचे अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा यांच्याकडे या पदाचा कार्यभार होता. सीबीआयचे महासंचालक ऋषी कुमार शुक्ला हे सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रवीण सिन्हा यांच्याकडे प्रभार देण्यात आला होता. आता सीबीआयच्या महासंचालकपदावर सुबोधकुमार जयस्वाल यांची वर्णी लागली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: CBI

    पुढील बातम्या