NEW Covid Strain in India : ‘वेगानं पसरतोय व्हायरस, काळजी घ्या,’ AIIMS च्या संचालकांचा इशारा

कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन (Corona Strain) भारतामध्ये दाखल झाला आहे. दिल्ली एम्स (Delhi AIIMS) च्या संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे.

कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन (Corona Strain) भारतामध्ये दाखल झाला आहे. दिल्ली एम्स (Delhi AIIMS) च्या संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 31 डिसेंबर : कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन (Corona Strain) भारतामध्ये दाखल झाला आहे. या नव्या व्हायरसची देशात 20 जणांना लागण झाल्याचं मंगळवारी स्पष्ट झालं होतं. या व्हायरसबाबत सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार अतिशय सावधगिरी बाळगत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दिल्ली एम्स (Delhi AIIMS) च्या संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी गंभीर इशारा दिला आहे. “कोरोना व्हायरसनं अनेक जागी वेगवेगळं रुप घेतलं आहे. मात्र ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोना जास्त वेगानं पसरतोय,’’ असा इशारा त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. काय म्हणाले गुलेरिया? “ब्रिटनमधील कोरोना स्ट्रेनचा अधिक वेगानं फैलाव होतो, ही बाब या विषयावरील अभ्यासातून समोर आली आहे. हा काळजीचा विषय असला तरी यामुळे घाबरण्याची गरज नाही. भारत सरकारनं ब्रिटनमधून येणारी विमानं रद्द करण्यासह अनेक उपाय केले आहेत. नव्या कोरोना स्ट्रेनचे पेशंट्स आणखी वाढले तर नवे उपाय देखील करण्यात येतील.’’ असे गुलेरियांनी स्पष्ट केले. ‘देशातील परिस्थिती चांगली’ डॉ. गुलेरिया यांनी यावेळी देशातील परिस्थितीबाबत सविस्तर मत मांडलं. “देशातील परिस्थिती चांगली आहे. दैनंदिन पेशंट्सच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर आपला रिकव्हरी रेटही उत्तम आहे. ब्रिटनमधील नवा स्ट्रेन हा नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला भारतामध्ये आल्याची शक्यता आहे. त्यानंतरही गेल्या 4-6 आठवड्यात पेशंट्सच्या संख्येत मोठी वाढ झालेली नाही. हा स्ट्रेन वेगानं पसरु नये यासाठी आपल्याला अधिक सावध राहणे आवश्यक आहे.’’ असं डॉ. गुलेरियांनी सांगितले. ‘दर दोन महिन्याला नवं रुप’ “या व्हायरसला नवा स्ट्रेन असं म्हंटलं जात असलं तरी तो दर दोन महिन्याला आपलं रुप बदलतो,’’ अशी माहिती डॉ. गुलेरियांनी दिली. “व्हायरसचं रुप दर दोन महिन्यांनी बदलत असलं तरी त्याची लक्षणं एकसारखी आहेत. हा नवा कोरोना तरुणांमध्ये जास्त पसरत आहे, त्यामुळे त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सध्याच्या डेटानुसार कोरोनावरील औषध हे या स्ट्रेनच्या बाबतही परिणामकारक ठरेल,’’ असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. कोरोना स्ट्रेन सर्वात प्रथम ब्रिटनमध्ये सापडला. त्यानंतर डेन्मार्क, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रांस, स्पेन, स्वित्झर्लंड, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूरमध्येही याचे पेशंट्स सापडले आहेत. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात ब्रिटनमधून 33 हजार प्रवासी भारतातमध्ये दाखल झाले आहेत. या सर्वांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचं काम सध्या सुरु आहे.
    Published by:News18 Desk
    First published: