VIDEO 'शिक्षक,पालक आणि सरकारने मिळून शिक्षण व्यवस्था खड्ड्यात घातली'

VIDEO 'शिक्षक,पालक आणि सरकारने मिळून शिक्षण व्यवस्था खड्ड्यात घातली'

'उत्तम विद्यार्थी तयार करण्यासाठी उत्तम शिक्षक घडवले पाहिजे आज ती प्रक्रियाच बंद झाली.'

  • Share this:

नवी दिल्ली 07 मे : जीवघेण्या स्पर्धेच दडपण मुलांवर येवू नये यासाठी काही वर्षांपूर्वी मेरिट लिस्ट बंद करण्यात आली. या निर्णयाचं कौतुकही झालं होतं. पण आता पुन्हा मेरिट लिस्ट द्यावी का याबद्दल चर्चा सुरू झालीय. आपल्या परिक्षा पद्धतीत अमुलाग्र बदल करण्याची गरज असून विद्यार्थ्यांना फक्त मार्क्स मिळविण्यासाठी नाही तर व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी तयार केलं पाहिजे असं मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं. सीएनबीसी आवाजच्या एका खास कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केलं. शिक्षक, पालक आणि सरकारने मिळून शिक्षण व्यवस्थेला  खड्ड्यात घातलं अशी टीकाही तज्ज्ञांनी केली.

वर्षभरचा अभ्यास वर्षाच्या शेवटी तीन तासांच्या पेपरमध्ये सोडवायचा. तीन तासांमध्ये सोडविलेला तो पेपर शिक्षक हा फक्त काही मिनिटांमध्ये तपासतो आणि त्या मुलाचं भवितव्य ठरवलं जातं. शिक्षणाची ही सगळीच प्रक्रिया चुकीचं असल्याचं मत लेखक आणि प्राध्यापक राजेंद्र प्रताप गुप्ता यांनी व्यक्त केलं. याच पद्धतीमुळे आपण नोबेल पारितोषिक जिंकणारे साहित्यक विद्वान निर्माण करू शकलो नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

शिक्षणाचं धोरण तयार करताना ज्यांच्यासाठी हे धोरण तयार करायचं असतं त्या विद्यार्थ्यांशीच बोललं जात नाही हे अतिशय दुर्दैवी आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. जे धोरणकर्ते आहेत त्यांनी बदलाचा निर्णय घ्यायचा असतो. मुलांना फक्त शिकवू नये तर त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. त्यांच्या मनात उत्तम विचारांचं बीज रोवलं गेलं पाहिजे. मेरिट लिस्ट नसल्यामुळे मुलांना प्रेरणा मिळणच बंद झालंय. सगळाच व्यवसाय झालाय.

खासगीकरण झाल्यामुळे फक्त नफाच बघितला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम विद्यार्थी तयार करण्यासाठी उत्तम शिक्षक घडवले पाहिजे आज ती प्रक्रियाच बंद झाली असं मत NCERTचे माजी अध्यक्ष जे. एस. राजपूत यांनी व्यक्त केलंय.

जास्तीत जास्त गुण मिळव्यासाठी सध्या जीवघेणी स्पर्धा आहे. प्रत्येकालाच वाटतं की आपल्या मुलाने 100 टक्के मार्क्स मिळवावे पण ते सर्वच मुलांना शक्य नसतं. आज फक्त 90 टक्क्यांच्या वर गुण मिळविणाऱ्याच मुलांची दखल घेतली जाते. इतरांना कुणीही विचारत नाही.

या सगळ्यांचा दबाव मुलं आणि पालकांवर आहे. ज्यांना कमी गुण मिळतात त्यांचा विचार कुणीही करत नाही. अशा मुलांबद्दल पालक आणि समाजानेही संवेदनशील व्हावं लागेल असं मत शिक्षणतज्ज्ञ रिना पंत यांनी व्यक्त केलं.

शिक्षणाच्या दुरावस्थेला सर्वच जण जबाबदार असल्याचा गंभीर आरोप माजी शिक्षण सचिव अनिल स्वरुप यांनी यावेळी बोलताना केला.

ते म्हणाले, मी सचिव असताना संबधीत सगळ्या घटकांना एकत्र करुन नवीन धोरण तयार करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला सगळ्यांनी होकार दिला मात्र नंतर सगळ्यांनी हात आखडता घेतला. कुणीही दूरदृष्टी ठेवून विचार करत नाही तर फक्त तत्कालीन विचार केला जातो. त्यामुळे शिक्षण पद्धतीत बदल होत नाही असंही स्वरुप यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 10:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading