CAAवरून दिल्लीत पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा, आता JNUची मुलंही रस्त्यावर

CAAवरून दिल्लीत पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा, आता JNUची मुलंही रस्त्यावर

देशभर जो असंतोष आहे त्यामागे कोण आहे हे माहित आहे. लोकांच्या भावना भडकविण्यासाठी काँग्रेसनेच चिथावणी दिल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 15 डिसेंबर : संसदेत मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात (Citizenship Amendment Act 2019) आता भडका उडालाय. दिल्लीतल्या (Jamia Millia Islamia University ) जामीया मिलीया विद्यापीठातल्या (AMU) विद्यार्थ्यांच्या निदर्शनाला हिंसक वळण लागलं. दिल्लीत तीन बसेस पेटवून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठातल्या आवारात घुसून प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली. त्यानंतर हा भडका जास्तच पेटला. जामीयाच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी JNU ची मुलंही रस्त्यावर उतरली त्यांनी दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयाला घेराव घालत तीव्र निदर्शने केलीत.  खबरदारीचा उपया म्हणून जामीया मिलीया विद्यापीठाला 5 जानेवारीपर्यंत सुट्टी देण्यात आलीय. तर दिल्ली मेट्रो प्रशासनाने 12 मेट्रो स्टेशन्स बंद केली आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले आहेत.

लालूच्या घरी 'हाय होल्टेज' ड्रामा, राबडीदेवींनी मारहाण केल्याचा सुनेचा आरोप

देशभर जो असंतोष आहे त्यामागे कोण आहे हे माहित आहे. लोकांच्या भावना भडकविण्यासाठी काँग्रेसनेच चिथावणी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. झारखंडमधल्या दुमका इथं एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. जे लोक आगी लावत आहेत त्यांच्या कपड्यांवरूनच ते कोण आहेत हे कळून येतं जास्त सांगायची गरज नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसने या विधेयकाविरोधात भूमिका घेतली होती. त्याचबरोबर काँग्रेसच्या काही नेत्यांनी या विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली होती.

पूर्वोत्तरेतल्या राज्यानंतर आता उत्तरेतल्या राज्यांमध्येही असंतोष उफाळलाय. राजधानी दिल्लीत रविवारी तीव्र निदर्शने करण्यात आलीय. दिल्लीतल्या जामिया भागात गेल्या काही दिवसांपासून निदर्शने सुरू होती. रविवारी तरुण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निदर्शनांना सुरुवात केली. यावेळी संतप्त तरुणांनी 3 बसेसना आगी लावल्या. त्याआधीही जामिया मिल्लिया इस्लामिया (Jamia Millia Islamia)च्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधा तीव्र निदर्शने केली होती.

CABच्या विरोधात

दिल्लीत भडका, आंदोलकांनी पेटवल्या तीन बसेस

जामिया मिल्लिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने हे शांततापूर्ण मार्गाने होत असल्याचं सांगितलं. मात्र परिस्थिती तशी नसल्याचं पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झालं. निदर्शनांमुळे अनेक रस्ते बदं केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. शुक्रवारी तरुणांनी संसद भवनावरच मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी लाठीहल्लाही केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2019 11:06 PM IST

ताज्या बातम्या