शाळेच्या प्रोजेक्टसाठी बाबांसोबत गेली होती 8 वर्षीय विद्यार्थिनी, परतताना झाला मोठा घात

शाळेच्या प्रोजेक्टसाठी बाबांसोबत गेली होती 8 वर्षीय विद्यार्थिनी, परतताना झाला मोठा घात

या मुलीचे नातेवाईक कल्याण स्टेशनवर उभे होते, मात्र बराच वेळ झाला तरी ती आली नाही

  • Share this:

कल्याण, 3 फेब्रुवारी : 40 वर्षीय भाजीविक्रेता आणि त्याची 8 वर्षांची मुलगी मुंबईतील RBI च्या मुख्यालयात शाळेच्या प्रोजेक्टसाठी गेले होते. आयशा आणि त्याचा जुळा भाऊ अर्श इयत्ता दुसरीत शिकत होते. शाळेतून त्यांना RBI संदर्भात प्रोजेक्ट दिला होता. त्यामुळे अर्शद आपली पत्नी फातिमा आणि 10 वर्षीय मुलगा ऐमर, आयशा, अर्श यांच्यासोबत RBIच्या मुख्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी प्रकल्पाला गरज असलेल्या इतर वस्तूंचीही खरेदी केली. आज अर्शद सर्वांना बाहेर जेवायलाही घेऊन जाणार होता.  प्रकल्पाचं काम झाल्यावर सर्वजणांनी CSMT वरुन लोकल पकड़ली. कोपर व कल्याण स्टेशनदरम्यान आयशाला बाथरुमला जायचे होते. अर्शदने आयशाला घेतले आणि त्याने लोकलबाहेर उडी घेतली. त्यातच लोकल सुरू झाली. त्यावेळी फातिमाने अर्शदला लोकल ट्रॅकवरुन चालत येण्यास सांगितले. हे सर्वजण कल्याण स्टेशनवर उभे राहिले. बराच वेळ झाला तरी अर्शद व आयशा आले नसल्याने फातिमाने घाबरुन रेल्वे पोलिसांना सांगितले. कल्याण GRP नी याबाबत तपास सुरू केला. यावेळी कल्याण व कोपरच्या रेल्वे ट्रॅकजवळ दोन मृतदेह आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. हे ऐकताच फातिमाच्य़ा पायाखालून जमीन गेली. रेल्वे ट्रॅकवरुन चालत असताना अर्शद व आयशाला मागून लोकलने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. रेल्वे ट्रॅकवरुन चालणे किती धोकादायक आहे हे वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र काही मिनिटांच्या घाईसाठी कोणाचा जीव जाणे हे अत्यंत दुर्देवी आहे.

First published: February 3, 2020, 11:18 AM IST

ताज्या बातम्या