शाळेला सुट्टी पाहिजे म्हणून विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला; लखनौच्या ब्राइटलँड शाळेतला प्रकार

शाळेला सुट्टी पाहिजे म्हणून विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला; लखनौच्या ब्राइटलँड शाळेतला प्रकार

शाळेला सुट्टी मिळावी म्हणून एका विद्यार्थिनीनं तिच्याच शाळेतल्या पहिलितल्या मुलावर चाकूनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधल्या ब्राइटलँड शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

19 जानेवारी : गुरूग्राम रायन इंटरनॅशनल शाळेतल्या हत्याकांडाची आठवण करून देणारी घटना लखनौमध्ये घटली आहे. शाळेला सुट्टी मिळावी म्हणून एका विद्यार्थिनीनं तिच्याच शाळेतल्या पहिलितल्या मुलावर चाकूनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधल्या ब्राइटलँड शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेला विद्यार्थी ऋतिकवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याची भेट घेतली आहे. दरम्यान ही घटना दडवून ठेवणाऱ्या मुख्याध्यापिकेसही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

या हल्ल्यात जखमी झालेला पहिलीतील विद्यार्थी ऋतिक याच्यावर केजीएमयूस्थित ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून चौकशीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकासही आता ताब्यात घेण्यात आलं आहे.

ऋतिकने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'सकाळी १०.३० च्या दरम्यान शाळेत प्रार्थना होणार होती. त्यावेळी एक दीदी माझ्या वर्गात आली. तिनं मला माझं नाव विचारलं आणि तिच्या सोबत ती मला मुलांच्या शौचालयात घेऊन गेली. मग तिनं शौचालयाचा दरवाजा आतून बंद करून घेतला. तिनं तिची ओढणी माझ्या तोंडात कोंबली. माझे दोन्ही हात मागे खेचून त्या ओढणीनेच बांधले. आणि चाकून सपासप चार हल्ले केले. आपल्याला मारू नये म्हणून ओरडत असताना त्या विद्यार्थिनीनं "तुला मारलं तर शाळेला सुट्टी मिळेल.'' असं म्हटल्याचंही ऋतिकने सांगितलं आहे. हा सगळा प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे त्याचा कसून शोध घेण्याचं काम सध्या पोलीस करत आहे.

First published: January 19, 2018, 11:02 AM IST

ताज्या बातम्या