गडचिरोली हल्ला: जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही- PM मोदी

गडचिरोली हल्ला: जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही- PM मोदी

गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले असून या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली/मुंबई, 01 मे : गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले असून या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.

वाचा: जवानांच्या हालचालीची गुप्त माहिती उघड झाली आणि घात झाला

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही- PM मोदी

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांच्या कुटुंबीया सोबत आहे. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. ज्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे त्यांना योग्य उत्तर दिले जाईल असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहराज्यपालांचे चहापान रद्द

गडचिरोली येथे पोलीसांवर झालेल्या दुर्दैवी नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज संध्याकाळी राजभवन येथील चहापान व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केला आहे. राज्यपालांनी महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवन येथे मान्यवर निमंत्रितांसाठी तसेच विविध देशांच्या प्रतिंनिधींसाठी चहापान तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


VIDEO: देशातील नक्षलवाद संपवणं काळाजी गरज- सुधीर मुनगंटीवार

गुप्त माहिती लिक झाली- केसरकर

C-60 पथकाच्या जवानांवर झालेला हल्ल्यासंदर्भात माहिती देताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, जवानांच्या हालचालीची गुप्त माहिती लिक झाली. ही माहिती बाहेर कशी गेली याचा शोध घेऊ. हे युद्धच आहे आणि त्याच आमची बाजू सरस असल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलवाद्यांना योग्य उत्तर दिले जाईल असे देखील केसरकर म्हणाले.

शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे- सुप्रिया सुळे 


VIDEO:कोणत्याही रंगाचा दहशतवाद अमान्यच- जावेद अख्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 03:46 PM IST

ताज्या बातम्या