नवी दिल्ली, 23 जून: उद्या (24 जून) आकाशात अनोखा खगोल शास्त्रीयदृष्ट्या (Astronomy) अविष्कार अनुभवता येणार आहे. उद्या चंद्र स्ट्रॉबेरी रंगात दिसणार आहे. जून पौर्णिमेला या स्ट्रॉबेरी मूनचं (Strawberry Moon) दर्शन घडत असतं. स्ट्रॉबेरी मून म्हणजे काय? त्याचं खगोलीय महत्व काय?
24 जून म्हणजे उद्या ग्रीष्म संक्रातीनंतरची पहिली पौर्णिमा आहे. यावेळी खगोलदृष्टया एक अनोखी घटना आकाशात घडणार असून ती अनुभवता देखील येणार आहे. उद्या आकाशात चंद्र स्ट्रॉबेरी रंगामध्ये दिसणार आहे. या खगोलीय घटनेला स्ट्रॉबेरी मून असं म्हणतात. या दिवशी चंद्राचा आकार मोठा आणि रंग (Colour) काहीसा स्ट्रॉबेरी सारखा असेल. जून महिन्यातील पौर्णिमेला दिसणाऱ्या अशा चंद्राला स्ट्रॉबेरी मून असं म्हणतात. काही ठिकाणी या चंद्राला हॉट मून (Hot Moon) किंवा हनी मून (Honey Moon) असं म्हणतात.
काय आहे वैशिष्ट -
यावेळी चंद्र आपल्या कक्षेतून पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने तो सामान्य आकारापेक्षा अधिक मोठा दिसतो. त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्याला चंद्राला स्ट्रॉबेरी मून असं म्हटलं जातं.
स्ट्रॉबेरी मून हे नाव कसं दिलं गेलं -
स्ट्रॉबेरी मून हे नाव प्राचीन अमेरिकी आदिवासींनी दिलेलं आहे. या आदिवासींच्या म्हणण्यानुसार, अशा पूर्ण चंद्राचं दर्शन झाल्याने तो दिवस पौर्णिमेचा समजला जातो आणि स्ट्रॉबेरी कापणीस सुरुवात केली जाते. खरंतर, स्ट्रॉबेरी मून हे अमेरिकेतील (America) एक स्थानिक नाव (Local Name) आहे. जगातील विविध देशांमध्ये या चंद्राला विविध नावांनी ओळखलं जाते. युरोपमध्ये स्ट्रॉबेरी मून हा रोज मून नावाने ओळखला जातो. हा चंद्र युरोपात गुलाब कापणीचं (Rose Harvesting) प्रतिक समजला जातो. उत्तर गोलार्धात हा चंद्र हॉट मून म्हणून ओळखला जातो. कारण हा चंद्र विषुववृत्ताच्या उत्तरेस उन्हाळा सुरु झाल्याचं सूचित करतो. त्यामुळे या भागात असा चंद्र उन्हाळा प्रारंभाचं (Summer Season) प्रतिक मानलं जातं.
स्ट्रॉबेरी मून हा सामान्यतः वसंत ऋतूतील शेवटच्या पौर्णिमेला किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला दिसतो. त्याला ब्लूमिंग मून, ग्रीन कॉर्न मून, होर मून, बर्थ मून, अंडी देणारा मून किंवा हॅचिंग मून, हनी मून किंवा मीड मून असं देखील म्हणतात. स्ट्रॉबेरी मून एका रात्रीपेक्षा अधिक काळापर्यंत दिसू शकतो.
नुकत्याच घडलेल्या काही खगोलीय घटना -
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक खगोलीय घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांत सुपर मून, ब्लड मून, चंद्र ग्रहण तसंच रिंग्ज ऑफ फायर म्हणजेच सूर्यग्रहण दिसलं होतं. आता 24 जूनला दिसणारा स्ट्रॉबेरी मून देखील खास असेल. हिंदु पंचांगानुसार, स्ट्रॉबेरी मून वसंत ऋतूची शेवटची पौर्णिमा आणि ग्रीष्म ऋतूची पहिली पौर्णिमा यांचं प्रतिक मानलं जातं. स्ट्रॉबेरी मूननंतर 24 जुलैला बक मून आणि 22 ऑगस्टला स्टर्जजन मून दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Moon