हैदराबाद, 02 जून: सासूबाईंनी (Mother in law) मनाविरुद्ध बायकोला (Wife) माहेरी नेल्याचा राग मनात धरून जावयाने धक्कादायक कृत्य केलं आहे. सासू आणि जावईच्या (Son in law) नात्याला कलंक फासत युवकाने आपल्या सासूबाईला चक्क अश्लील व्हिडीओ क्लिप्स (Sent pornographic videos) पाठवल्या आहे. यामुळे घरातील प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेलं आहे. याप्रकरणी पीडित सासुने आपल्या जावयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप जावयाला अटक केली नसून घटनेचा तपास सुरू आहे.
संबंधित घटना तेलंगणातील हैदराबाद येथील असून आरोपी जावयाचं नाव मोहम्मद अक्रम पाशा असं आहे. तो हैदराबादमधील ज्युबिली हिल्समधील कार्मिक नगर परिसरातील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. आरोपी जावई पाशाचं सात महिन्यांपूर्वी परिसरातील एका मुलीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीपासून आरोपी पाशा आपल्या बायकोला किरकोळ कारणावरून सतत त्रास देत होता. त्याचबरोबर त्याने आपल्या बायकोला माहेर जाण्यासही मज्जाव केला होता.
अशात सासूबाईने आपल्या गर्भवती लेकीला माहेरी नेल्याचा भलताच राग आरोपीला आला. मनाविरुद्ध बायकोला माहेरी नेल्याने त्याने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. खरंतर आरोपीची बायको पाच महिन्यांची गर्भवती आहे. शनिवारी आरोपी आपल्या पत्नीला रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला होता. यावेळी त्याच्या सासूने आपल्याला काही दिवसांसाठी मुलीला माहेरी नेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जावयाला केली. मात्र त्याने यावेळीही बायकोला माहेरी घेऊन जाण्यास नकार दिला.
हे वाचा-Dhule Crime: पत्नी फोनवर बोलत असल्याचं पाहून पतीला आला राग; ब्लेडने सपासप वार
तेलंगणा टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सासूबाईने जावयाच्या दबावाला न जुमानता आपल्या लेकीला जबरदस्तीने घरी घेऊन गेली. याचा राग मनात धरून आरोपीने बायकोच्या माहेरी जाऊन तिच्या घरच्यांना शिवीगाळ करत धमकावलं. आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही. तर त्याने आपल्या सासूच्या मोबाईलवर अश्लील भडक व्हिडीओ क्लीप्स पाठवल्या. याप्रकरणी सासूने हैदराबादमधील ज्युबिली लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Hyderabad