स्मृती इराणींनी मागितला होता नरेंद्र मोदींचा राजीनामा!

स्मृती इराणी यांनी नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मागितला होता.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 02:13 PM IST

स्मृती इराणींनी मागितला होता नरेंद्र मोदींचा राजीनामा!

2014मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांना राहुल गांधींविरोधात अमेठीमधून पराभवाचा सामना करावा लागला. पण, पुन्हा एकदा स्मृती इराणींनी राहुल गांधींना आव्हान दिलं आहे. 23 मार्च या दिवशी स्मृती इराणींचा वाढदिवस असतो.

स्मृती इराणी या गुजरातच्या आहेत. 'क्योंकि सांस भी कभी बहु थी' या मालिकेनं त्यांना ओळख मिळवून दिली. दरम्यान, स्मृती इराणी यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडायला सुरूवात केली होती. यावेळी त्यांनी गुजरातमध्ये झालेल्या दंगलीवरून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टिका केली होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण, 2014मध्ये मी नरेंद्र मोदींवर केलेली टीका मागे घेत असल्याचं म्हटलं होतं.

2003मध्ये भाजपचं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर स्मृती इराणींनी दिल्लीतील चांदनी चौकमधून लोकसभेच्या रिंगणात उतरत काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांना आव्हान दिलं होतं. पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Loading...

त्यानंतर 2004मध्ये स्मृती इराणींची वर्णी महाराष्ट्र युथ विंगच्या उपाध्यक्षपदी झाली. 2010मध्ये त्यांच्यावर भाजपच्या महिला मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली.

2011मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. त्याच वर्षी त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशच्या महिला मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली. स्मृती इराणी या नरेंद्र मोदींच्या विश्वासातील व्यक्तींपैकी एक आहेत.

2014मध्ये स्मृती इराणी अमेठीमधून पराभूत झाल्या होत्या. पण त्यानंतर देखील त्यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यावरून त्यांच्यावर टीका देखील झाली. पण, त्याकडे त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही.

1998मध्ये स्मृती इराणी मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचल्या होत्या. पण, तिथं त्यांना विजयानं हुलकावणी दिली.

2000मध्ये स्मृती इराणी यांनी 'हम है कल आज कल और कल' या मालिकेमध्ये काम केलं. पण, 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेनं त्यांना खरी ओळख मिळवून दिली. अभिनय क्षेत्रात त्यांनी अकादमी अवॉर्ड, चार इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड आणि 8 स्टार परिवार अवॉर्ड जिंकले आहे.

2004मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बीएची डिग्री असल्याचा उल्लेख केला होता. पण, 2014मध्ये त्यांनी ओपन लर्निंगमधून बीकॉमचं शिक्षण घेतल्याचा उल्लेख केला. त्यावरून देखील मोठा वाद झाला होता.

केंद्रीय विद्यालयांमध्ये तिसरी भाषा जर्मन ऐवजी संस्कृत शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी अमेठी तयार आहे, असं उत्तर देत मोदींच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यामुळे, आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ते अमेठीमध्ये होणाऱ्या लढतीकडे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 02:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...