1,300 वर्षांपासून एकाच जागी आहे 'कृष्णा बटर बॉल', मोदींनी भेट दिलेल्या या स्थळाबद्दल तुम्हाला माहितीये का?

1,300 वर्षांपासून एकाच जागी आहे 'कृष्णा बटर बॉल', मोदींनी भेट दिलेल्या या स्थळाबद्दल तुम्हाला माहितीये का?

जाणून घ्या कृष्णा बटर बॉल या दगडाबाबत...

  • Share this:

महाबलीपूरम, 12 ऑक्टोबर: तामिळनाडू(Tamilnadu)मधील महाबलीपूरम (Mahabalipuram) शहर सध्या चर्चेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग(Xi Jinping) हे दोन्ही नेत्यांची भेट या शहरात होत आहे. या दोन्ही नेत्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत मोदी आणि जिनपिंग यांच्या मागे एक मोठा दगड दिसत आहे. हा दगड धोकादायक पद्धतीने झुकलेला दिसत आहे. सध्या या दगडाची ऐतिहासिक, सांस्कृती आणि पौराणिक इतिहासाची चर्चा होत आहे. जाणून घेऊयात दगडाबाबत...

1 हजार 300 वर्षाचा इतिहास...

मोदी आणि जिनपिंग यांच्या मागे दिसत असलेल्या ज्या दगडाची सध्या चर्चा होत आहे त्याला कृष्णा बटर बॉल असे म्हटले जाते. एक दोन नव्हे तर 1 हजार 300 वर्षाापासून हा दगड भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना तोड देत आहे तसा उभा आहे. झुकलेल्या अवस्थेत असलेल्या या दगडाचे वजन 250 टन इतके आहे. धोकादायक झुकलेल्या अवस्थेत असलेला हा दगड हटवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले पण त्याला यश आले नाही. या दगडाच्या उत्सुकतेमुळे जगभरातील पर्यटक महाबलीपूरमला भेट देतात.

देवाचा दगड

कृष्णा बटर बॉल हा दगड एका डोंगरावर आहे. 20 फूट उंट आणि 5 मीटर लांब या दगडाचे वजन 250 टन इतके आहे. विशाल असा हा दगड डोंगराच्या एका टोकावर अगदी कमी जागेवर उभा आहे. या दगडाकडे पाहिल्यानंतर असे वाटते की कधीही हा दगड कोसळेल. डोंगरावर 45 डिग्री उतारावर हा दगड 1 हजार 300 वर्षापासून आहे त्या अवस्थेत आहे.

गुरुत्वाकर्षणाचा परिणाम नाही

या दगडावर गुरुत्वाकर्षणाचा कोणताही परिणाम होत नाही. स्थानिक लोकांच्या मते देवाने हा दगड महाबलीपूरम येथे ठेवला होता. देवाला तो किती शक्तिशाली आहे हे दाखवायचे होते त्यासाठी त्याने स्वर्गातून हा दगड येथे आणला, असे येथील लोक मानतात. भूवैज्ञानिकांच्या मते पृथ्वीवर झालेल्या नैसर्गिक घटनांमुळे या दगडाची निर्मिती झाली असावी आणि तो असामान्य अवस्थेत उभा आहे.

कृष्णाची लोणी...

हिंदू लोकांच्या मते श्री कृष्ण आईने तयार केलेली लोणी लपून छपून घ्यायचे. श्री कृष्णाने चोरलेली लोणी घट्ट होऊन हा दगड तयार झाल्याचे मानले जाते. कृष्णा बॉलकडे पाहिल्यानंतर असे वाटते की, तो कधी पडेल पण गेल्या 1 हजार 300 वर्षात असे झाले नाही. हा दगड हटवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले पण त्याल कधीच यश आले नाही. सर्वात प्रथम 630 ते 668 मध्ये दक्षिण भारतावर राज्य करणाऱ्या पल्लव शासक नरसिंह वर्मा यांनी हा दगड हटवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला यश आले नाही. हा दगड स्वर्गातून पृथ्वीवर आल्यामुळे त्याला कोणी हात लावू शकत नाही असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

सात हत्तींना शक्य झाले नाही

भारतावर ब्रिटिशांचे राज्य असताना 1908मध्ये मद्रासचे गव्हर्नर आर्थर लावले यांनी हा दगड हटवण्याचा प्रयत्न केला होता. लावले यांना असे वाटत होते की हा दगड घसरेल आणि डोंगराच्या खाली राहणाऱ्या गावावर कोसळेल. यासाठी त्यांनी सात हत्तींची मदत घेतली. अनेक वेळा प्रयत्न करुन देखील हा दगड जागचा हलला नाही. अखेर गव्हर्नर लावले यांनी हात टेकले.

भारत-चीन संबंधाचा सेतु झाला कृष्णा बटर बॉल

विज्ञान इतके पुढे गेले असले तरी आतापर्यंत याचे कारण कळाले नाही की केवळ 4 फूट आधारावर हा 250 टन दगड कसा काय उभा आहे. काहींच्या मते हा दगड झुकण्याचे मुख्य कारण म्हणजे घर्षण आणि गुरुत्वाकर्षण होय. घर्षणामुळे हा दगड घसरत नाही तर गुरुत्वाकार्षणाचे केंद्र या दगडाला 4 फूटाच्या आधारावर उभा करतो. इतिहासाची आवड असणारे चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना भेटण्यासाठी महाबलीपूरमची निवड करून मोदींनी दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केला आहे.

'लढाई पैलवानांसोबत होते, इतरांसोबत नाही' हातवारे करत पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published by: Akshay Shitole
First published: October 12, 2019, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading