या घटनेनंतर इंदिरा गांधी यांनी केली होती आणीबाणीची घोषणा !

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2018 03:12 PM IST

या घटनेनंतर इंदिरा गांधी यांनी केली होती आणीबाणीची घोषणा !

मुंबई, 25 जून : भारतीय राजकारणात 25 जून हा खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे. कारण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 25-26 जूनच्या रात्री 1975 मध्ये आणीबाणीची घोषणा केली होती.

रायबरेली निवडणुकीत इंदिरा गांधी यांचे प्रतिस्पर्धी अपयशी उमेदवार राजारायणन यांनी निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्याचा दावा दाखल केला होता. 12 जून 1975 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिरा यांना यात दोषी ठरवलं. त्यामुळे निवडणुका रद्द केल्या गेल्या. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पद सोडण्याचा निर्णय घेतला आणि 6 वर्षांकरिता निवडणूक रद्द केली गेली. या घटनेच्या 13 दिवसांनंतर आणीबाणी लागू करण्यात आली होती. .

इंदिरा गांधींनी घोषित केलं की, 'राष्ट्रपतींनी तात्काळ आणीबाणी घोषित केली आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.'

25 जून 1975 च्या रात्री भारतात अंतर्गत आणीबाणी घोषित करण्यात आली. यावेळी विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी जे सत्ता आणि इंदिरा गांधी यांच्या विरोधात बोलले ज्यांना तरुंगात टाकण्यात आलं.

त्या काळात संजय गांधी राजकारणात खूप सक्रिय झाले. या काळात त्यांनी कौटुंबिक नियोजन करणं, अतिक्रमण काढून टाकणं, शहरे सुशोभित करणं, हुंडा प्रथा बंद करणं अशी कामं त्यांनी केली. पण विरोधी आणि माध्यमांच्या हस्तक्षेपाशिवाय ते काम करत होते.

Loading...

या दरम्यान, एका सुंदर स्त्रीने जुन्या दिल्लीच्या परिसरातील अनेक कामांमध्ये संजय गांधींना मदत केली. त्यांचं नाव होतं रुखसाना. त्यांना आणीबाणी प्रमुख ग्लॅमर गर्ल असंही म्हणतात.

रुखसाना या बॉलीवूड अभिनेत्री अमृता सिंग यांच्या आई होत्या.

यावेळी अटल बिहारी वाजपेयी जेलमध्ये होते. कारागृहात असताना त्यांना बातमी मिळाली की, काँग्रेस नेता 'इंदिरा इज इंडिया' असा नारा देत होते. तेव्हा त्यांनी रागात येऊन जेलमध्येच एक कविता लिहली. आणि त्यात काँग्रेस नेत्यांसाठी लिहलं की 'चमचों के सरताज'

अटल बिहारी वाजपेयी जेव्हा जेलमधून बाहेर आले, त्या दिवशी विरोधी नेत्यांनी रामलीला मैदानावर एक मोठी सभा आयोजित केली. हिवाळी दिवसांमध्येसुद्धा फक्त अटलजींचं भाषण ऐकण्यासाठी जनता 9 वाजेपर्यंत बसली होती. त्या भाषणावेळी अटलजींच्या भाषणातल्या 3 ओळींनी सगळ्यांना नाराज केलं.

आणीबाणीच्या काळात, त्या काळातील सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गाण्यांना दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडियोवर बंदी घालण्यात आली होती.

खरंतर, तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांनी किशोर कुमार यांना इंदिरा गांधी यांच्यासाठी गाणे गाण्यास सांगितलं होत, पण त्यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर, त्यांच्या गाण्यांवर सुमारे 3 वर्ष बंदी घालण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...