मालाड ते बागपत जेल असा होता मुन्ना बजरंगीचा प्रवास

फार कमी वयातच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला आणि त्याने शाळेला रामराम ठोकला

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2018 07:35 PM IST

मालाड ते बागपत जेल असा होता मुन्ना बजरंगीचा प्रवास

उत्तर प्रदेश, 09 जुलैः उत्तर प्रदेशमधील कुख्यात गँगस्टरपैकी एक असलेल्या प्रेम प्रकाश उर्फ मुन्ना बजरंगीच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली. मागील चार दशकांपासून उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी जगतात मुन्ना बजरंगीच्या नावाची चर्चा होती. इतकेच नव्हे तर पूर्वांचलच्या या डॉनने राजकारणातही आपले नशीब आजमावून पाहिले होते. 29 ऑक्टोबर 2009 मध्ये पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले होते. यानंतर तो उत्तर प्रदेशमधील अनेक तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्याच्या हत्येशी निगडीत काही महत्त्वाच्या घडामोडींची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

- माजी बसपा आमदार लोकेश दीक्षित यांच्याकडे खंडणी मागण्याच्या आरोपात मुन्ना बजरंगीविरोधात सोमवारी बागपत कोर्टात खटला सुरू होणार होता.

- मुन्नाला रविवारी रात्री झांसी तुरुंगातून बागपत तुरुंगात आणण्यात आले.

- मुन्नाला कुख्यात गुंड सुनील राठी आणि विक्की सुंहेडा यांच्यासोबतच एका बराकमध्ये ठेवण्यात आले.

- त्याच्यात त्या रात्री थोडी बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर सुनीलने त्याच्याकडची पिस्तुल काढली आणि मुन्नावर उगारली.

Loading...

- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना निलंबित केले असून न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

- मुन्नाची हत्याही एक कटकारस्थान होतं, असं त्याच्या वकिलाने सांगितलं.

- मुन्ना बजरंगीची पत्नी सीमा सिंहने 10 दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेद्वारे मुन्नाची हत्या करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली होती.

- सीमाने मुन्नाच्या हत्येप्रकरणी एटीएफच्या दोन पोलिसांवर संशय व्यक्त केला आहे.

- गेल्यावर्षी लखनऊमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये मुन्ना बजरंगीचा साडू पुष्पजीत सिंहची हत्या करण्यात आली होती.

१९६७ मध्ये उत्तर प्रदेश जिल्ह्यातील पुरेदयाल गावात जन्मलेल्या मुन्ना बजरंगी पाचवी इयत्तेपर्यंतच शिकला. या काळातच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला आणि त्याने शाळेला रामराम ठोकला. वयाच्या १७ व्या वर्षी त्याच्याविरोधात जौनपूरमधील सुरेही ठाण्यात मारहाण आणि अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचाः

अवघ्या 11 दिवसांत कोर्टाने दिली 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा

... म्हणून 'सेक्स टॉक'साठी एक्स- प्रियकराच्या कुटुंबियांचे तयार केले FB अकाऊंट

थायलंडः गुफेत अडकलेल्या मुलांनी असा साजरा केला वाढदिवस

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 04:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...