07 मे : हवामान खात्यानं अंदाज वर्तविल्यानुसार काल रात्री धुळीच्या वादळाचा तडाखा दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही बसला. या वादळामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशात वेगाने वारे वाहत असून, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
त्याआधी काल संध्याकाळी धुळीचे वादळ चंदीगड, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये धडकलं. त्यानंतर रात्री या वादळाचा तडाखा दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही बसला. धुळीच्या या वादळामुळे काळोख दाटला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसही झाला.
हवामान खात्याने आधीच 20 राज्यांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवत सर्तकतेचा इशारा दिला होता. दिल्लीत आणि जवळपासच्या सर्व शहरांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने अनेक शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहे. दिल्ली मेट्रो आणि इतर रेल्वेगाड्यांनीही सुरक्षे वाढवली आहे.
कोणतीही जीवित आणि आर्थिक हानी टाळण्यासाठी वादळी वाऱ्यादरम्यान गाड्या घेऊन रस्त्यावर येऊ नका, आलात तरी गाडीची पार्किंग लाईट आणि अपर-डिपरचा वापर करा, ज्याने तुम्हाला शोधण्यास मदत होईल असं आव्हान दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, High alert, Ncr, Storm