भारतात येणारी प्रवासी वाहतूक लगेच बंद करा, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने व्यक्त केली भीती

भारतात येणारी प्रवासी वाहतूक लगेच बंद करा, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने व्यक्त केली भीती

जगभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर आता पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. युकेमध्ये कोरोनाची लाट पुन्हा आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर :भारतात कोरोनाची (Corona) लाट ओसरली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दुसरी लाट येण्याची शक्यताही मावळली आहे. पण, आता जर दुसरी लाट आलीच तर त्याचा धोका पहिल्यापेक्षा जास्त असण्याची भीती वर्तवली जात आहे. खबरदारी म्हणून युकेतून येणारी विमान सेवा बंद करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan ) यांनी केली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर आता पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. युकेमध्ये कोरोनाची लाट पुन्हा आली आहे. त्यामुळे युकेमधून भारतात येणारी विमान सेवा बंद ठेवली पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटींच्या घरात पोहोचली आहे. परंतु, नवीन रुग्ण आणि कोरोनामुळे मृतांचे प्रमाण कमी झाले आहे.  नव्या वर्षात कोरोनाचा (Coronavirus) भर ओसरणार, देश कोरोनामुक्त होणार, अशी भविष्यवाणी चर्चेत होती. पण त्यात किती तथ्य आहे?  केंद्रीय पातळीवर तयार करण्यात आलेल्या एक्सपर्टस पॅनेलने (Expert Panel) सुपर मॉडेलच्या (Super Model) आधारे असं म्हटलं आहे की, भारतीय प्रशासनाची उदासीनता आणि कोरोनाबाबत (Corona) अपेक्षित प्रमाणात चाचण्या करण्यासाठी पुरेशी क्षमता नसल्याने खरी परिस्थिती लक्षातच आलेली नाही. या पॅनेलच्या मते,  फेब्रुवारी 2021 मध्ये देशात कोरोना मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला असेल, पण धोका संपलेला नसेल.

थंडीत पुन्हा महागणार अंडी; गेल्या 3 वर्षातील किंमतीचा रेकॉर्ड मोडीत

या पॅनेलने त्यांच्या सुपर मॉडेलनुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातील कोरोना साथ जवळपास संपुष्टात येईल, असा अंदाज वर्तवला आहे. भारतात या कालवाधीनंतर कोरोना संसर्गाची लाट येण्याची शक्यता नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये अक्टिव्ह केसेसची संख्या केवळ 20 हजारच राहील, कारण संसर्ग झाला आहे की नाही हे स्पष्ट होऊ न शकलेल्या केसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल.

दरम्यान, राज्यात कोरोनाची  लागण होण्याच्या प्रमाणात घट होत असली तरी मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात 2064 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी 3811 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या 24 तासात 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  शनिवारी हा आकडा 75 इतका होता. तर रविवारी हा आकडा 98 पर्यंत पोहोचला आहे.

राज्यातून 1783905 जणांचा डिस्चार्ज झाला आहे. यानुसार रिकव्हरी रेट 94.06 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आजच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर दिवसागणिक वाढत आहे, आणि ही चिंता वाढवणारी बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे नियमित पालन करणे गरजेचे आहे.

Published by: sachin Salve
First published: December 21, 2020, 12:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या