अमरनाथ यात्रेकरूंसाठी भारतीय जवानांनी पर्वतालाही रोखलं, VIDEO झाला व्हायरल

अमरनाथ यात्रेकरूंसाठी भारतीय जवानांनी पर्वतालाही रोखलं, VIDEO झाला व्हायरल

बाबा बर्फानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्तांना यातून बाहेर काढण्य़ासाठी पुन्हा एकदा भारत तिबेट सीमा पोलीस (ITBP)सज्ज झाले आहे.

  • Share this:

अमरनाथ, 06 जुलै : अमरनाथला बाबा बर्फानींच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्तांवर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यालगत असणारी दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. बाबा बर्फानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्तांना यातून बाहेर काढण्य़ासाठी पुन्हा एकदा भारत तिबेट सीमा पोलीस (ITBP)सज्ज झाले आहे. या संकटातून अमरनाथ यात्रेतील भक्तांना बाहेर काढण्यासाठी हे जवान त्यांची ढाल झाले आहेत. असं म्हणायला हरकत नाही.

शुक्रवारी बालटालमध्ये अमरनाथ यात्रेच्या मार्गावर डोंगरावरून दगड कोसळत होती. यामुळे यात्रेकरूंना पुढे जाण्यात अडचण आली. त्याचवेळी आयटीबीपी जवानांनी पुढाकार घेतला आणि खडकावर दगड थांबविण्यासाठी उभे राहिले. डोंगरावरून दरड कोसळणं थांबेपर्यंत जवान तिथे तैनात होते. असं असतानाही भक्तांचा प्रवास थांबवण्यात आला नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता जवानांनी कशा पद्धतीने आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांना जाण्यासाठी मदत केली.

अमरनाथ यात्रा अनंतनाग जिल्ह्यातून 36 कि.मी. लांब परंपरागत पहलगाम मार्ग आणि गांदेरबल जिल्ह्याच्या 14 किमी लांब बालताल मार्गातून पुढे सरकते. सांधु-संतांसह अनेक श्रद्धाळू भाविक आता जम्मूमध्ये पोहचण्यास सुरुवात झाली आहे.

जम्मूचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी सांगितले की, 'यात्रेकरूंना सोयीसाठी आणि त्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही यात्रा 15 ऑगस्ट रोजी संपेल.'

 

First published: July 6, 2019, 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading