शेअर बाजारात भूकंप! 850 अंकांची घसरण, बुडाले 3 लाख कोटी

शेअर बाजारात भूकंप! 850 अंकांची घसरण, बुडाले 3 लाख कोटी

मुंबईमध्ये शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण सुरूच आहे.

  • Share this:

मुंबई, 04 ऑक्टोबर : मुंबईमध्ये शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण सुरूच आहे. सेन्सेक्स तब्बल 850 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीतही 260 अंकांची घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घट झाली आहे.

3.13 लाख कोटी बुडाले - शेअर बाजाराच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे 3.13 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. खरं तर बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सचं मूल्यांकन 1,43,71,351.05 कोटी रुपयांवरून 1,40,57,705.04 कोटी रुपयांवर आलं आहे.

गुंतवणूकदारांनी आता काय करावं - कोटक म्युच्युअल फंडाचे एमडी निलेश शाह यांच्या सांगण्यानुसार, चलन (भारतीय रुपया), क्रेडिट आणि व्याज मार्केटमधून आलेल्या वाईट बातमीमुळे बाजारात घट झाली आहे. याशिवाय, आयएल आणि एफएस रेटिंगच्या डाउनग्रेडवर दबाव आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अशा वेळी घाबरू नये, तर उत्तम शेअर्समध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं आहे.

शेअर बाजाराचा रेपो दर 3-4 वाढीने सुरू आहे. कच्च्या तेलाच्या चलनवाढीचा धोका वाढत आहे, अशा परिस्थितीत पॉलिसीच्या दरामध्ये 0.25 टक्के वाढ शक्य आहे असं मतही निलेश शहा यांनी व्यक्त केलं आहे.

रुपयाच्या घसरणीमुळे चिंता - रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने गुरुवारी स्थानिक शेअर बाजारामध्येही घसरण झाली. गुरुवारी रुपयाची किंमत पुन्हा घसरली. डॉलरच्या तुलनेत रुपया 73.70 वर बंद झाला.

तर बुधवारी बीएसई 30 शेअर निर्देशांक सेन्सेक्स 550 अंकांनी घसरला आणि 35, 976 वर बंद झाला. दुसरीकडे, एनएसईचा 50 शेअर निर्देशांक निफ्टी 150 अंकांनी घसरून 10,858 वर बंद झाला.

 

VIDEO : फायनान्शिअल मॅनेजमेंट - पगार हाती आल्यावर करायची ही ७ कामं

First published: October 4, 2018, 12:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading