अॅसिड बॉम्ब हल्ल्याचा कट उधळला, 2 दहशतवाद्यांना अटक

अॅसिड बॉम्ब हल्ल्याचा कट उधळला, 2 दहशतवाद्यांना अटक

फारुख आणि रहुल अमीन अशी मुर्शिदाबादमधून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचं नावं आहेत.

  • Share this:

कोलकाता, 28 फेब्रुवारी : पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद इथून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अॅसिड बॉम्ब बनवण्याचं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. अॅसिड बॉम्ब बनवून त्याद्वारे हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा प्रयत्न होता.

फारुख आणि रहुल अमीन अशी मुर्शिदाबादमधून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचं नावं आहेत. त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं . याबाबत स्पेशल टास्क फोर्सच्या सूत्रांनी माहिती दिली आहे.

ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही दहशतवादी हे कौशिक आणि सज्जाद या कुख्यात दहशतवाद्यांचे साथीदार आहेत. कौशिक आणि सज्जाद हे 2014 मध्ये बर्दवान इथं झालेल्या स्फोटातील आरोपी आहेत, ज्यांना जानेवारीतच अटक करण्यात आलेली आहे.

फारुख आणि रहुल अमीन यांना अटक केल्याने मोठा कट उधळल्याचं बोललं जात आहे. कारण या दोघांनी अॅसिड बॉम्बद्वारे घातपात करण्यासाठी कट रचला होता, अशी माहिती आहे.


SPECIAL REPORT : भारत Vs पाक, LOC वर असं झालं घमासान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 10:56 AM IST

ताज्या बातम्या