स्टेंटच्या किमती कमी करण्याला आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा विरोध

स्टेंटच्या किमती कमी करण्याला आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा विरोध

अॅन्जिओप्लास्टीसाठी लागणाऱ्या स्टेंटच्या किंमती 80 टक्क्यांनी घटवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी विरोध केला आहे.

  • Share this:

23 एप्रिल : अॅन्जिओप्लास्टीसाठी लागणाऱ्या स्टेंटच्या किंमती 80 टक्क्यांनी घटवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी विरोध केला आहे. हा विरोध करत अबॉट मेड्ट्रोनिक कंपनीने भारतीय बाजारातून स्टेंट्स काढून घेतले आहेत. अबाॅटने बाजारातून दोन अपडेटेड स्टेंट्स काढून घेतले आहेत.

भारतातील स्टेंट्स बाजारात अबॉट मेड्ट्रोनिक कंपन्यांचे 60 टक्के मार्केट शेअर आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेल्या विरोधाची ही सुरुवात आहे. त्यामुळे या किमतींवर सरकारने पुन्हा विचार करण्याची गरज आहे.

भारतीय कायद्यानुसार स्टेंट हे औषध जीव-रक्षक असल्याने त्याचा समावेश राष्ट्रीय आवश्यक औषध यादीत करून त्यांच्या किमतींवर नियंत्रण आणावं, ही आरोग्य-चळवळ कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका दाखल झाल्या होत्या. त्यानुसार 14 फेब्रुवारीला सरकारनं स्टेंट किंमत-नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय करत अधिसूचना काढली.

सर्वसामान्यांसाठी सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला बहुराष्ट्रीय कंपन्या या निर्णयाच्या विरोध करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2017 12:22 PM IST

ताज्या बातम्या