पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त होणार,अरुण जेटलींची घोषणा

पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त होणार,अरुण जेटलींची घोषणा

  • Share this:

नवी दिल्ली, 4 आॅक्टोबर : इंधन दरवाढीच्या भडक्यानंतर अखेर केंद्र सरकारला जाग आलीये. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतलीये. यासाठी केंद्र सर्व राज्यांना अबकारी कर कमी करण्याची सुचना करणार आहे.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरीकडे वाटचाल केलीये. त्यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दररोज वाढ होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांची पत्रकार परिषद घेऊन इंधन दरवाढीवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला.

पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी अबकारी करात कपात केली पाहिजे. पेट्रोलियम कंपन्यांकडून 1 रुपया तर केंद्र सरकारने दीड रुपयांची कपात केलीये. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात झालीये अशी घोषणा जेटली यांनी केली.

राज्य सरकारला याबद्दल तशी सुचना देण्यात येणार आहे. राज्य सरकारनेही अबकारी करात अडीच रुपये कपात केली तर इंधनाच्या करांमध्ये एकूण पाच रूपयांची कपात होऊ शकते अशी माहिती जेटली यांनी दिली.

या कपातीमुळे सरकारच्या तिजोरीवर 10.50 हजार कोटींचा भार पडणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय बाजारात डाॅलरच्या तुलनेत रुपयांची घसरण झालीये. त्यामुळे क्रुड तेलाच्या किंमतीत वाढ झालीये. पेट्रोलियम कंपन्यांच्या हातात दरवाढ असल्यामुळे ती वाढत आहे असं स्पष्टीकरण जेटली यांनी दिलं.

=============================================

Video : आर्य चाणक्यांनी दिलेले हे ६ उपदेश ऐकाल तर यशस्वी व्हाल

First published: October 4, 2018, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading