खासगी क्लासेसवर राज्य सरकार आणणार कायदा! - विनोद तावडे

अनेक खासगी क्लासेस आणि कॉलेजसचं एकमेकांशी टायअप असणं, शाळा-कॉलेजच्या वेळात क्लासेस असणं, अवाजवी फी आकारणी अशा अनेक बाबींमुळे विद्यार्थी पालकांची पिळवणूक होते.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2017 09:50 AM IST

खासगी क्लासेसवर राज्य सरकार आणणार कायदा! - विनोद तावडे

27 डिसेंबर : अनेक खासगी क्लासेस आणि कॉलेजसचं एकमेकांशी टायअप असणं, शाळा-कॉलेजच्या वेळात क्लासेस असणं, अवाजवी फी आकारणी अशा अनेक बाबींमुळे विद्यार्थी पालकांची पिळवणूक होते. यावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार कायदा आणत आहे. पहिली ते बारावीच्या खासगी क्लासेसला हा कायदा लागू होणार होईल. पण या कायद्यावर खाजगी क्लासेस चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे पालक पहिलीपासूनच आपल्या मुलांना क्लासेसमध्ये टाकतात. त्यात आई-वडील नोकरीला असणं आणि मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणं यातून खाजगी क्लासेसला खूपच महत्त्व वाढतं. पण पालकांनी आपल्या मुलांना खाजगी क्लासेसला टाकताना त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा, असं मत जागृत पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.

शाळा आणि कॉलेजच्या वेळात खाजगी शिकवण्यांची वेळ असता कामा नये. तसंच विद्यार्थीसंख्या आणि क्लासेस फी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तरतूद करण्यात येणार असून सरकार याकडे काटेकोर लक्ष देणार असल्याचं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हंटलं आहे.

शिक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांनी मात्र आपल्या शाळा-महाविद्यालयाची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी राज्य सरकारने खासगी क्लासेसवर लक्ष ठेवाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून खासगी क्लासेस नियंत्रण कायदा आवश्यक असल्याचं सांगितलं जातयं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 09:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...