रिक्षावाल्यावर 200 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप; GST अधिकाऱ्यांचा छापा

रिक्षावाल्यावर 200 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप; GST अधिकाऱ्यांचा छापा

Auto Driverनं 200 कोटींचा tax चोरी केल्याच्या आरोपाखाली GST अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.

  • Share this:

सुरत; 02 जुलै : उत्तर प्रदेशातील कचोरीवाल्यावर टॅक्स चोरीचा आरोप झाल्यानंतर आयकर विभागानं छापेमारी केली होती. या कचोरीवाल्याचं उत्त्पनं वर्षाला 1 कोटीपेक्षा देखील जास्त असल्याचं म्हणत आयकर विभागाने त्याला नोटीस देखील पाठवली आहे. दरम्यान, आता GST अधिकाऱ्यांनी सुरतमधील ऑटो चालकाच्या घरावर देखील छापा मारला असून त्याच्यावर 200 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप आहे. सुरेश गोहिल असं या रिक्षा चालकाचं नाव आहे. GST अधिकाऱ्यांनी मारलेल्या छापेमारीमुळे सुरेश गोहिल आणि घरवाले देखील थक्क झाले. त्यांना काय चाललंय याचा देखील अंदाज येईना. सुरेंद्र हे भरूच येथे रिक्षा चालवत असून त्यांची रोजची कमाई किमान 200 रूपये आहे. बराच वेळ सर्च ऑपरेशन केल्यानंतर देखील GST अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही.

गुजरातमध्ये हिंदूंचं मोठ्या प्रमाणावर धर्मांतर; 863 जणांना हवाय धर्म बदलून

घरची परिस्थिती बेताची

सुरेंद्र गोहिल दिवसा 200 रूपयांची कमाई करतात. पावसाळ्यात त्यांचं घर गळत आहे. GST अधिकाऱ्यांच्या मते सुरेश गोहिल हे कंसल्टंट कंपनीचे मालक आहेत. त्यांची कंपनी ही ऑनलाईन रजिस्टर देखील असून त्यांनी 200 कोटींचा टॅक्स देखील चुकवला आहे.

कागदपत्रांवर सुरेश गोहिलांचं नाव

कंपनीच्या कागदपत्रांवर सुरेश गोहिल यांचं नाव आहे. पण, छापेमारीमध्ये देखील काहीही हाती न लागल्यानं GST अधिकारी देखील हैराण असून कंपनीचा खरा मालक कोण? याचा शोध आता अधिकारी घेत आहेत. दरम्यान, सुरेश गोहिल यांचं शिक्षण हे तिसरीपर्यंत सुरू आहे.

खून का बदला खून से; 29 वर्षानंतर वडिलांच्या हत्येचा घेतला बदला

कचोरीवाल्यावर छापा

उत्तर प्रदेशातील कचोरीवाल्यावर टॅक्स चोरीचा आरोप झाल्यानंतर आयकर विभागानं छापेमारी केली होती. या कचोरीवाल्याच्या विरोधात लखनौच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर एकच खळबळ माजली. अलिगढच्या व्यापारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कचोरीवाल्या मुकेशचा तपास केला. या तपासणीत या कचोरीवाल्याने स्वत:च आपल्या उत्पन्नाची कबुली दिली.

VIDEO : कार चालकांनो पाहा 'हा' व्हिडीओ, सावध राहा तुमचाही जाऊ शकतो जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: GSTgujarat
First Published: Jul 2, 2019 07:33 PM IST

ताज्या बातम्या