• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • विजय मल्ल्या प्रकरण: कर्जाची 6,200 कोटी रक्कम वसूल करण्यासाठी SBI नं घेतला मोठा निर्णय

विजय मल्ल्या प्रकरण: कर्जाची 6,200 कोटी रक्कम वसूल करण्यासाठी SBI नं घेतला मोठा निर्णय

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्त्वात असलेल्या बँकांचा एक गट किंगफिशर एअरलाइन्सला (Kingfisher Airlines) देण्यात आलेल्या 6,200 कोटी रुपयांच्या कर्जाची वसूली व्यापारी विजय मल्ल्याच्या (Vijay Mallya) तीन कंपन्यांमधील भागधारकांची विक्री करुन करणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 19 जून : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्त्वात असलेल्या बँकांचा एक गट किंगफिशर एअरलाइन्सला (Kingfisher Airlines) देण्यात आलेल्या 6,200 कोटी रुपयांच्या कर्जाची वसूली व्यापारी विजय मल्ल्याच्या (Vijay Mallya) तीन कंपन्यांमधील भागधारकांची विक्री करुन करणार आहे. मल्ल्याचे युनायटेड ब्रुअरीज लिमिटेड, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि मॅक्डोव्हल होल्डिंग्स लिमिटेडमधील शेअर्स 23 जून रोजी बल्क डीलद्वारे विकले जातील. किंगफिशर एअरलाइन्स ऑक्टोबर 2012 पासून बंद आहे. कर्ज फेडण्यासाठी आणि बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी जानेवारी 2019 मध्ये मल्ल्याला देशातून फरारी आर्थिक अपराधी घोषित करण्यात आले होते. तो ब्रिटनच्या न्यायालयात प्रत्यार्पणाच्या विरोधात खटला लढवत आहे, जर मल्ल्याचे शेअर्स विकले गेले तर किंगफिशर विजय मल्ल्या प्रकरणातील बँकांची ही पहिली मोठी वसुली असेल. किंगफिशरला दिलेले कर्ज 2012 च्या उत्तरार्धात नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट (NPA) झाले होते. मार्च 2016 मध्ये मल्ल्या देश सोडून गेला. त्याच्यावर 17 बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. Flying Sikh मिल्खा सिंग यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान निधन मनीकंट्रोलला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, शेअर्सची विक्री बेंगळुरूच्या डेब्ट रिकव्हरी ट्रिब्यूनल (DRT) च्या देखरेखीखाली होईल. ज्याने 6,203 कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यासाठी समभागांची विक्री करण्याचे वसुली अधिकार अधिकाऱ्यास दिले आहे. जर ब्लॉक डील अंतर्गत शेअर्स विकले गेले नाहीत, तर बँका समभाग ब्लॉक किंवा रिटेलच्या माध्यमातून विकू शकतात. एसबीआयशिवाय किंगफिशरला कर्ज देणार्‍या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, अलाहाबाद बँक, फेडरल बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यांचा समावेश आहे. नंदीग्रामची लढाई आता कोर्टात, ममतांनी न्यायाधीश बदलण्याची केली मागणी कारण... या प्रकरणात, फरारी विजय मल्ल्या यानी मागेच माध्यमांना दिलेल्या निवेदनात असा दावा केला होता, की त्याने जितके कर्ज घेतले त्यापेक्षा जास्त किमतीची त्याची संपत्ती जप्त केली गेली आहे. ट्विटमध्ये मल्ल्या म्हणाला होता की, 'टीव्ही पाहत असताना वारंवार माझ्या नावाचा उल्लेख फरारी किंवा फसवणूक केलेला असा केला जातो. किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्जापेक्षा ईडीने माझी मालमत्ता अधिक जप्त केली आहे, हे कोणालाच मान्य नाही का? मी अनेक वेळा असं म्हटलं, की मी कर्जाची 100% रक्कम परत देईन? यात फसवणूक किंवा धोका कोठे आहे?
  Published by:Kiran Pharate
  First published: