स्टेट बँकेचं कर्ज महागलं, बँकेच्या मार्जिनल कॉस्टवर आधारित कर्ज दरांमध्ये 0.10% वाढ

स्टेट बँकेचं कर्ज महागलं, बँकेच्या मार्जिनल कॉस्टवर आधारित कर्ज दरांमध्ये 0.10% वाढ

स्टेट बँकेनं मार्जिनल कॉस्टवर आधारित कर्ज दरांमध्ये ०.१० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्टेट बँकेच्या नव्या ग्राहकांना कर्जांवर अधिक व्याज द्यावं लागणार आहे.

  • Share this:

02 जून : स्टेट बँकेनं मार्जिनल कॉस्टवर आधारित कर्ज दरांमध्ये ०.१० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्टेट बँकेच्या नव्या ग्राहकांना कर्जांवर अधिक व्याज द्यावं लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच करण्यात येणार असल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आलं.

'एमसीएलआर'मध्ये वाढ झाल्याचा कोणताही परिणाम बेस रेटने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर होणार नाही. स्टेट बँकेने चालू वर्षात दुसऱ्यांदा 'एमसीएलआर'मध्ये वाढ केली आहे. यापूर्वी बँकेने मार्च महिन्यात 'एमसीएलआर'मध्ये ०.२ टक्के वाढ केली होती. दोनच दिवसांपूर्वी स्टेट बँकेने निश्चित कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती.

स्टेट बँकेपाठोपाठ सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियानेही 'एमसीएलआर'मध्ये ०.१० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'एमसीएलआर'वर आधारित कर्जे घेणाऱ्या ग्राहकांनाही जादा दराने व्याज भरावे लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम कर्जाचा हप्ता वाढण्यावर होणार आहे.

 

First published: June 2, 2018, 9:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading