शिवम सिंह (भागलपूर) 23 मार्च : आपण पैसे काढण्याचे एटीएम ऐकलं आहे. त्याचबरोबर हल्ली पाण्यासाठीसुद्धा काही एटीएम बसवल्याचे आपण ऐकत आलो आहे. परंतु दुधाचे देखील एटीएम असू शकते असे तुम्ही ऐकले आहे का? दरम्यान बिहारमधील एका शेतकऱ्याने भागलपूरमध्ये मोबाईलद्वारे दुधाचे एटीएम सुरू केले आहे.
विनय कुमार या शेतकऱ्याने कृषी मेळाव्यात मोबाईल द्वारे दुधाचे एटीएम आणले होते याचीच या मेळाव्यात चर्चा रंगली होती. विनय याने दिलेल्या माहितीनूसार, सुरुवातीला त्याने एका छोट्या दुकानात दुधाचे एटीएम सुरू केले. पूर्वी तो एका विमा कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. नोकरी सोडल्यानंतर सुरुवातीला त्यांनी 1 वर्ष अनेक कामांवर संशोधन केले.
भागलपूर येथून स्टार्टअप अंतर्गत प्रशिक्षण घेतले. याचबरोबर त्याने इतर 35 शेतकऱ्यांची साथ घेतली. त्यातून मोबाईल दुधाचे एटीएम संकल्पना सुरू करून भागलपूर शहरातील सर्व परिसरात निश्चित वेळेत दूध पोहोचेल याची काळजी घेतली. मोबाईल मिल्क एटीएम हा एक स्टार्टअप प्रोग्राम आहे. यामध्ये शासनाकडून कोणतीही मदत झालेली नसल्याचेही त्यांनी सागिंतलं.
मिल्क एटीएमची कल्पना टीव्हीवरून आली. त्यानंतर सबूर कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण घेतल्यानंतर दुधाचे एटीएम सुरू केले. आमच्या दुधाच्या एटीएमद्वारे आम्ही लोकांमध्ये विश्वासार्हता मिळवली आहे. नियमित ग्राहकांमध्ये आमच्या शहरातील अनेक नामवंत डॉक्टर्स, उच्चपदस्थ अधिकारी आहेत. यासोबतच काही हॉटेलमध्येही दूध पुरवठा केला जातो. दुधाच्या दर्जाबाबत आम्ही तडजोड करत नसल्याचेही तो म्हणाला.
मिल्क एटीएममधून 48 रुपये लिटरने दूध दिले जाते. दरम्यान होम डिलिव्हरी अंतर्गत दुधाची किंमत 52 रुपये प्रति लिटर आहे. 4 अंश सेंटीग्रेड तापमानात थंड झाल्यावर आम्ही ते दूध दुकानातील एटीएममध्ये ठेवतो. यासोबतच भागलपूरच्या रहिवाशांसाठी दही, पनीर आणि बटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच होम डिलिव्हरीसाठी तुम्ही 94706 65702 किंवा 6201103878 वर कॉल करू शकता असेही सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.