मदरशांमध्येही हनुमान चालीसाचे पठण सुरू करा, भाजप नेत्याची मागणी

मदरशांमध्येही हनुमान चालीसाचे पठण सुरू करा, भाजप नेत्याची मागणी

अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्याने ही मागणी केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : मंगऴवारी नवी दिल्लीत पुन्हा आम आदमी पक्षाने विजयाचा झेंडा फडकवला आहे. अरविंद केजरीवाल यांनी काल दिल्लीत 70 पैकी 62 जागांवर विजय मिळवल्यानंतर हनुमानजींचे आभार मानले. यानंतर त्यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी ट्वीट करून अरविंद केजरीवाल यांच्याकडे मागणी केली आहे की, आता दिल्लीतील मदरशांसह सर्व शाळांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हनुमान चालीसाचे पठण सुरू करावे.

त्यांनी लिहिले की अरविंद केजरीवाल यांना विजयाबद्दल अभिनंदन! नक्कीच, जो हनुमानजींच्या आश्रयाला येतो त्याला आशीर्वाद मिऴतो. आता वेळ आली आहे की, दिल्लीतील सर्व शाळा, मदरसे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये हनुमान चालीसाच्या पठणाचे आयोजन करणे आवश्यक आहे. विजयवर्गीयांनी विचारले की, बजरंगबलीच्या कृपेने आता 'दिल्लीवासी' मुलांनी का वंचित राहावे?

निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर केजरीवाल म्हणाले की, आजचा दिवस हा भगवान हनुमानाचा आहे. ज्याने दिल्लीतील लोकांना आशीर्वाद दिला आहे. आम्ही प्रार्थना करतो की, हनुमानजींनी आम्हाला योग्य मार्ग दाखवत राहावे, जेणेकरून आम्ही पुढील पाच वर्षे लोकांची सेवा करत राहू.

First published: February 12, 2020, 2:28 PM IST

ताज्या बातम्या