पश्चिम बंगालमध्ये 'एल्फिस्टन स्टेशन'ची पुनरावृत्ती, २ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये 'एल्फिस्टन स्टेशन'ची पुनरावृत्ती, २ जणांचा मृत्यू

हावडा येथील संतरागाछी रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडण्यासाठी चेंगराचेंगरीची घटना घडलीये.

  • Share this:

२३ आॅक्टोबर : पश्चिम बंगालमध्ये मुंबईतील एल्फिस्टन स्टेशन दुर्घटनेची पुनरावृती झालीये. हावडा येथील संतरागाछी रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडण्यासाठी चेंगराचेंगरीची घटना घडलीये.या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झालाय तर ३५ जण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलंय.

मिळालेल्या माहितीनुसार,संतरागाछी रेल्वे स्टेशनवर प्रवाशी प्लॅटफाॅर्म दोन आणि तीनवर रेल्वेची वाट पाहत होते. नागरकोयल एक्‍स्प्रेस थांबल्यानंतर प्रवासी पायऱ्याने जाण्याचा प्रयत्न करत होते. पण स्टेशनवर गर्दी प्रचंड वाढली होती त्यामुळे काही प्रवासी हे पुलावरून खाली कोसळले. प्रवासी पडल्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.

दक्षिण पूर्व रेल्वेचे प्रवक्त्याने सांगितलं की, ही घटना जेव्हा घडली तेव्हा एक एक्सप्रेस रेल्वे आणि दोन ईएमयू लोकल रेल्वे एकाच वेळी 6:30 वाजता स्टेशनवर पोहोचल्या होत्या. दोन्ही गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवासी प्लॅटफॉर्मकडे जात होते.

एसईआरचे प्रवक्ता संजय घोष यांनी सांगितलं की, नागरकोइल-शालीमार एक्स्प्रेस आणि दोन ईएमयू लोकल एकाच वेळी रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या होत्या. शालीमार-विशाखापट्टम एक्स्प्रेस आणि संतरागाछी-चेन्नई एक्स्प्रेस लवकरच पोहोचणार होत्या. तिथेच दोन आणि तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मदरम्यान पादचारी पूल होता तिथे ही चेंगराचेंगरीची घटना घडली.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अधिकाऱ्यांनी हेल्पलाईन नंबरही जारी केलाय.

खड़गपुर मध्ये 032221072 आणि संतरागाछीसाठी 03326295561 हा नंबर प्रसिद्ध केलाय.

===================

First Published: Oct 23, 2018 09:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading